जळगांव शहरातील महामार्गावर अपघातांची श्रृखला अव्याहतपणे सुरु आहे. या अपघातात वाहनचालकांची चुक असेल पण या सोबतच या रस्त्यांची रुंदी न वाढविणे ही सुध्दा या अपघातांना जबाबदार असलेली प्रमुख गोष्ट आहे.
गेल्या अनेक वर्षांपासुन आम्ही अनेक पातळ्यांवर आंदोलने केली याचा परिणाम म्हणून शासनाचे लक्ष आम्ही या जिवघेण्या प्रश्नांकडे वेधुन घेतले. यामुळेच जळगांव शहरातील महामार्ग व समांतर रस्त्याचा डि.पी.आर. मंजुरीसाठी गेला. या प्रकरणी याचा त्वरीत पाठपुरावा करुन सदर काम तातडीने हाती घेणे गरजेचे असुन शहरातील नागरीकांच्या जिविताला या महामार्गामुळे मोठा धोका आहे. या धोक्याला शहरातील किमान एक लाख लोक सामोरे जात आहेत, यावरुन या प्रश्नाचा गांर्भीय लक्षात घेवुन शहरातुन मार्गक्रमण करणारा सहा पदरी समांतर रस्त्यासह रुंदीकरणाव्दारे विकसित करणेचे कार्य सत्वर हाती घेणे बाबत मा.महापौर श्री.ललित कोल्हे यांनी म.जिल्हाधिकारी, जळगांव यांना विनंती केलेली आहे. चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्या बरोबर जळगांव शहरातील महामार्ग त्याच लेनिंग व समांतर रस्ते हे प्राधान्य क्रमाने करावे असा हरित लवादाचा निर्णय आहे. मा.कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन आपण सदर महामार्गाचे काम त्वरीत सुरु करण्यासाठी कार्यवाही करावी अशी विनंती मी जळगांव शहराचा महापौर या नात्याने मा.श्री.ललित कोल्हे यांनी म.जिल्हाधिकारी यांचेसह मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन जलसंपदा मंत्री तसेच जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.