Search This Blog
Friday, November 24, 2017
जातप्रमाणपत्राबाबत शासनाचा महत्वाचा निर्णय ! आ. खडसे यांच्या प्रयत्नांना यश
Tuesday, November 14, 2017
कमी दराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा- ना. सुधीर मुनगंटीवार
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत ठेवावी या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय रिझर्व बँक आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्तपणे आयोजित टाऊनशिप मीटिंग संपन्न....
देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी एस. बी. इंडस्ट्रीज आणि समृध्दी प्लॉस्ट च्या प्रतिनिधींना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली. खान्देशात अशाप्रकारचे चर्चासत्र प्रथमच होत असल्याने या चर्चासत्रास जिल्हयातील उद्योजक तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बुऱ्हाडे यांनी तर आभार श्री. दामले यांनी मानले.
"सामना "मधुन शिवसेने ने केले खडसेंचे समर्थन
भाजपा ने खडसे यांचे दाऊद सोबत संबंध जोडुन खडसे यांच्या देशभक्तीवर गंभीर आरोप केले आहेत .
एकीकडे सेना भाजपा यांच्यात राज्यात भांडणे सुरु असतांना दुसरीकडे आ.खडसे यांचे समर्थन केल्यामुळे राज्यभरातील राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुलांनी आयुष्यभर आपल्यातली निरागसता जोपासावी –ना. विनोद तावडे
मुंबई, दि. 14 : दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बालदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळच्यावतीने आयोजित कार्यक्रमात श्री.तावडे बोलत होते. यावेळी बालभवनच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नामवंत बाल साहित्य लेखिका डॉ. विजया वाड, बालभवनचे संचालक राजेंद्र अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बालभवनच्या सभागृहात जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध छायाचित्रांची पाहणी श्री.तावडे यांनी करुन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेतली. छायाचित्र कलेमध्ये सफाईदारपणा आणि सर्जनशीलता येण्यासाठी वेगवेगळी रंगसंगती वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना श्री.तावडे म्हणाले, बालभवनच्या परिसरात आज या लहान मुलांची चित्रकला बघताना मला लहानपणीचे दिवस आठवले. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली वेगवेगळी छायाचित्रे त्यांच्यातील सूप्त कलागुणांचे दर्शन घडवणारी आहेत. लहानपणी आपल्याला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवलं त्यावेळी या विषयात मला रुची यायला लागली. तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन पुस्तकांशी संवाद साधायला शिका. अभ्यास हा कंटाळवाणा न होता ती एक आनंददायी प्रक्रिया बनून जाईल. पाठ्यक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचन वाढवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा सल्ला देखील श्री. तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रमासाठी आजपासून विशेष मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता 15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (BLOs) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. या कार्यक्रमात पुर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नांव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना क्र.6 चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. सन 2018 च्या पुनरिक्षणासाठी पात्र नागरिकांना नमुना क्र. 6 चे वाटप करणे व त्यांच्यकडून परत घेणे व जमा करणे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थालांतरित व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना क्र.7 चे वाटप करणे व जमा करणे. प्रारुप मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना क्र. 8 चे वाटप करणे व जमा करणे. मतदाराचे मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे. अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटूंबाकडून प्राप्त करुण घेणे. दुबार मतदारांना सुचना बजावणी करणे व पंचनामा करणे. कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे, मतदार यादीत मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही अशा मतदारांचे नजिकच्या काळातील छायाचित्र मतदारांकडून प्राप्त करुण घेणे इत्यादी महत्वाची कामे करण्यात येणार आहे.
सर्व मतदारांनी या विशेष मोहिम अंतर्गत मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.
जळगावने सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातूनदेशाला नवी दिशा देण्याचे काम केले- किशोर राजे निंबाळकर
भारतीय रिझर्व बँक मुंबईच्या वित्तीय समावेशन विभागातर्फे खान्देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योजकांसाठी जिल्हा नियोजन भवनात चर्चासत्राचे (टाऊन हॉल मिटिंग) आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव, उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने लहान उद्योगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हयात पूरक उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. जळगाव, भुसावळ सारखे रेल्वे जंक्शन असून डिसेंबर अखेर विमानसेवाही सुरु होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन उद्योजकांनी आपले उद्योग जिल्हयात सुरु केले पाहिजे असे सांगून उद्योजकांना व कर्जदारांना बँकाकडून मिळणाऱ्या वागणूकीबाबत मात्र त्यांनी खंत व्यक्त केली. ग्राहकांशी संवाद वाढवून बॅकांनी पतपुरवठा वाढविला पाहिजे जेणेकरुन उद्योग उभे राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर या चर्चासत्राच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविल्या जाव्यात असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राचा उद्देश सांगताना भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव म्हणाले की, आतापर्यंत रिझर्व बँक जेथपर्यंत पोहोचली नाही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आजचे चर्चासत्र याच कार्यक्रमाचा भाग आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही विकासात बँक महत्वाचा घटक असल्याने बँकांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली पाहिजे असे सांगून उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख म्हणाले की, प्लॅस्टीक पार्कसाठी जळगाव जिल्हयातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. तसेच केळी प्रक्रिया उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन जिल्हयात तसे क्लस्टर तयार करावे यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. उद्योग विभागामार्फत उद्योगांची नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय यांनी त्यांच्या विभागामार्फत् उद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी एस. बी. इंडस्ट्रीज आणि समृध्दी प्लॉस्ट च्या प्रतिनिधींना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली. खान्देशात अशाप्रकारचे चर्चासत्र प्रथमच होत असल्याने या चर्चासत्रास जिल्हयातील उद्योजक तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बुऱ्हाडे यांनी तर आभार श्री. दामले यांनी मानले.
Monday, November 13, 2017
ना. गिरीष महाजन यांची जळगाव मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी...
जळगाव शहरात दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारात सहा जणांच्या मृत्यूची माध्यमात चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमिवर वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांनी आज सायंकाळी उशीरा मनपात पदाधिकारी, अधिकारी व प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या नाकर्तेपणावर ना. महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छता वाढवून साथ रोग नियंत्रणासाठी तंबी दिली. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व इतर नगरसेवकांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व नगरसेवकांनी तक्रारी केल्या की, मनपात मनुष्यबळ व यंत्रणा पुरेशी आहे पण अधिकारी वर्ग काम करीत नाही.मच्छर, डिस निर्मूलनासाठी यंत्रे वापरात नाही. वॉर्डातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. आमदार भोळे यांनी थेट अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सर्व बाजू ऐकून ना. महाजन यांनी सर्वांना झापून काढले. ते म्हणाले, संपूर्ण शहर साथरोगांनी तस्त आहे. प्रत्येक घरात रुग्ण आहे. तरी पण मनपाच्या दप्तरी केवळ ११५ संशयित रुग्णाची पालिकेत नोंद आहे. हेच तर नाकर्तेपणाचे लक्षण आहे. ना. महाजन यांनी धुरळणी यंत्राच्या वापराविषयी विचारल्यार अधिकाऱ्यांनी मान्य केले की, सर्व यंत्रे बंद आहेत. याचे कारण पालिकेने काही वर्षा पासून जंतूनाशकच विकत घेतलेले नाही.
घंटागाड्यांचा विषय आल्यानंतर अनेक वॉर्डात कचरा गोळा करायला घंटागाड्याच येत नाही असे नगरसेवक म्हणाले. याची कारणे अधिकाऱ्यांना विचारली असता, किरकोळ व फालतू कारणे दाखवून घंटा गाड्या जात नाही, असे सांगण्यात आले. मनपाचे कनिष्ट अधिकारी सहकार्य करीत नाहीत असे नगरसेवक म्हणाले.
आपल्या वॉर्डात घंटागाड्या वेळेवर येतील याकडे लक्ष द्या अशी सूचना ना. महाजन यांनी नगरसेवकांना केली. मनपाच्या स्वच्छता विभागात पुरेसे कर्मचारी व यंत्रणा आहे. त्याचा योग्य पध्दतीने वापर करा, असे ना. महाजन म्हणाले.
स्वच्छतेसाठी मनपाला एक महिना मोफत जेसीबी देवू असे आ. भोळे म्हणाले.शहरात साथीचे रुग्ण जास्त आहेत हे लक्षात घेवून कारवाई करा. स्वच्छता मोहीम राबवा, अशीही सूचना त्यांनी केली. नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र टाकायला लावा. कचरापेटीची सवय लावा असेही ना. महाजन म्हणाले.
धुरळणी करणाऱ्यां सोनवणेंचे कौतुक
जळगाव शहरातगेले दोन महिने माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वखर्चाने धुरळणी करुन मच्छर, डास निर्मूलन करीत असल्या बद्दल त्यांचे कौतुक ना. महाजन यांनी केले. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य अमर जैन, सुनील महाजन व स्वखर्चाने धुरळणी करीत असलेल्या नगरसेवकांचा. उल्लेख करण्यात आला.
उध्दव पुन्हा गरजले "मी सरकारवर नाराज"
आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.
आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Sunday, November 12, 2017
नोकरी! नोकरी! नोकरी !
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बातमी आहे.
सिडको (CIDCO) मध्ये विविध पदांच्या एकूण ५७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या ५७ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
सिडकोतर्फे प्रोग्रामर, फील्ड ऑफिसर (जनरल), फील्ड ऑफिसर (सोशल सर्विस), लिपिक टंकलेखक, कंम्प्युटर ऑपरेटर, लेखा लिपिक अशा एकूण ५७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
एकूण जागा - ५७
प्रोग्रामर: १ जागाफील्ड ऑफिसर (जनरल): ४ जागाफील्ड ऑफिसर (सोशल सर्विस): १ जागालिपिक टंकलेखक: २७ जागाकंम्प्युटर ऑपरेटर: ३ जागालेखा लिपिक: २१ जागा
शैक्षणिक अर्हता:
प्रोग्रामर या पदासाठी कम्प्युटर सायन्सची पदवी, SAP ग्लोबल प्रमाणपत्र आवश्यकफील्ड ऑफिसर (जनरल) या पदासाठी विधी पदवी आवश्यक आहेफील्ड ऑफिसर (सोशल सर्व्हिस) या पदासाठी सोशल वर्कमध्ये एमएची पदवी आवश्यकलिपिक टंकलेखक या पदासाठी १० वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. तसेच MSCITकंम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, कंप्युटर ऍप्लिकेशन्स डिप्लोमा / पदवीतर, लेखा लिपिक या पदासाठी वाणिज्य सह १२वी उत्तीर्ण
वयाची अट:
१ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ५ वर्षांची सूट)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
२७ नोव्हेंबर २०१७
रायसोनीतील उर्वशी शर्मा यांची विभागीय संघात निवड
मुलीला लहान कारणावरुन चटके दिल्याप्रकरणी चौकशी करा : आ. डॉ. नीलम गो-हे
मी आहे लाभार्थी ची राष्ट्रवादी महीला आघाडी ने केली पोलखोल
विविध वाहिन्यांवर झळकत असलेल्या राज्य शासनाच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई गुलाब पवार (मोहमुख, ता. कळवण) यांना सरकारने २०१५ मध्ये शौचालय, तर २०१७ मध्ये घरकुल मंजूर केले.
एवढेच नाही, तर स्वच्छतादूत असलेल्या या महिलेची ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केलीच पण त्यांना सहा महिन्यांचे मानधन दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा खराच आहे. या सर्व घडामोडींमुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली असून, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून महिलांची बदनामी करणारी वक्तव्ये थांबवावीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
सहा महिन्यांपासून मानधन नाही
‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई पवार या महिला स्वच्छता भारत अभियानाच्या स्वच्छतादूत म्हणून काम करतात. मोहमुख पाड्यावरील १६८ कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्याचे त्या काम करतात. आतापर्यंत तेथे १५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत; परंतु स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून काम केल्याचे मानधन अजून दिले नसल्याचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगितले. सरकारने स्वच्छतादूत महिलेलाच ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केल्याची चलाखी केल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी वक्तव्य करताना कुठलीही माहिती न घेता बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे, हे लक्षात येते. तसेच राज्यकर्त्यांची महिलांविषयीची मानसिकता लक्षात येते, असा आरोप सौ. वाघ यांनी केला. वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देऊ, असेही त्या म्हणाल्या.
Saturday, November 11, 2017
कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट PDF स्वरूपात?
२. या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.
३. तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.
















