आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यामुळेच शासनाचा महत्त्वाचा निर्णय
आता या पुढे जातीचा दाखला काढण्यासाठी घरातील रक्त संबंधातील कोणाचेही एकाचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर पुराव्यांची आवश्यकता राहणार नाही. या संबंधी २४नोव्हेंबर२०१७ रोजी शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे आ. एकनाथराव खडसे यांनी याबाबत वेळोवेळी विधानसभेत सरकारविरोधी आक्रमक होत जातप्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नात्त्यातीला एकाचे जरी जातप्रमाणपत्र असेल तर दुसरे कोणतेही प्रमाणपत्र घेवु नये, असे विधान केले होते अखेर सरकारने विधेयक करुन तसा निर्णय २४नोव्हेंबर२०१७ रोजी प्रसिध्द केला आहे.Search This Blog
Showing posts with label #shivsena. Show all posts

Friday, November 24, 2017
Tuesday, November 14, 2017
कमी दराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा- ना. सुधीर मुनगंटीवार
वस्तू आणि सेवा कर प्रणालीत हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर ५ टक्के इतका कमी करण्यात आला असून याबद्दलची अधिसूचना निर्गमित होताच या कमी कर दराचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वित्तमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी केले. आज सह्याद्री अतिथीगृहात हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ( वेस्टर्न इंडिया) च्या प्रतिनिधींनी वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांची भेट घेऊन कर दर कमी केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत ठेवावी या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सामना "मधुन शिवसेने ने केले खडसेंचे समर्थन
शिवसेने ने आपले मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामधुन माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडण करत भाजपावर निशाणा साधला आहे .
भाजपा ने खडसे यांचे दाऊद सोबत संबंध जोडुन खडसे यांच्या देशभक्तीवर गंभीर आरोप केले आहेत .
एकीकडे सेना भाजपा यांच्यात राज्यात भांडणे सुरु असतांना दुसरीकडे आ.खडसे यांचे समर्थन केल्यामुळे राज्यभरातील राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Monday, November 13, 2017
उध्दव पुन्हा गरजले "मी सरकारवर नाराज"
‘होय, मी सरकारवर नाराज आहे, असे जाहीर सभेत बोलतो. कोपऱ्यात जाऊन कशाला बोलु ,अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कथित गौप्यस्फोटावर केली. पवार हे पंतप्रधानांचे गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आमदार जाधवांना सबुरीचा सल्ला देत, ‘चांगले काम करा शिवसेना निश्चित सोबत असेल, असे त्यांनी सांगितले
आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.
आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sunday, November 12, 2017
मुलीला लहान कारणावरुन चटके दिल्याप्रकरणी चौकशी करा : आ. डॉ. नीलम गो-हे
पुणे, ता. ११/११/२०१७ :
पुण्याच्या हडपसर परिसरात एका लहान मुलीने मसाल्यात पाणी सांडल्याच्या कारणावरून महिलेने तिला अनेक ठिकाणी चटके दिल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी आज शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गो-हे यांनी पोलिस अधिका-यांकडे केली. आज सायंकाळी त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेऴी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व महिला पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्याकडून केसबाबत व उपचारांची माहिती घेतली. आ. डॉ.गो-हे यांनी या प्रकरणात बंगलादेशींकडून होणारे काही अनैतिक मानवी व्यापार(ह्यमन ट्रॅफिकिंग)चा काही धागादोरा आहे का या दृष्टीने शहानिशा करण्याबाबत सूचना केली. काही काळापूर्वी अशीच एक सरोगसीची केस या परिसरात घडली होती. या घटनेतील सदर पीडित मुलीस योग्य त्या संस्थेत दाखल करावे,चुकीच्या हाती ताबा मिळू नये,दोषींवर योग्य कलमे लावून कायदेशीर कारवाई व्हावी अशा स्वरुपाची अपेक्षा आ. डॉ. गो-हे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी तक्रारकर्त्या रजनीश तिवारी यांना मिळाली नसल्याचे निदर्शनाला आणल्यावर ती पोलिसांनी त्वरित दिली. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,नगरसेविका प्राची आल्हाट, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी, शादाब मुलाणी, मनीषा वाघमारे,संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)