Search This Blog

Friday, April 6, 2018

गरिब जनतेचे हित जपणारे सरकार ! अमित शाह

भाजपा सरकार हे गरिब जनतेचे हित जपणारे सरकार आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. मुंबई येथील भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष १० सदस्य मिळून तयार झाला होता मात्र आज या पक्षाचे सदस्य लाखोपटीने वाढले असून कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष वाढला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारदर्शी, गरीब जनतेचे हित पाहणारे, ग्रामीण भागाची प्रगती करणारे आणि आर्थिक आराखडा मजबूत करणारे सरकार निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. जनतेने आमच्या विचारसरणीला समजले आहे त्यामुळे आज भाजपचा झेंडा देशातील ७० टक्के भागावर फडकलेला दिसत आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावर्षी भाजपचे सदस्य देशातील २० हजार गावांमध्ये जावून योजनांची माहिती देतील यामुळे लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचेल आणि या योजनांचा लाभ नागरिक घेऊ शकतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. २०१९ च्या निवडणुका भाजप बहुमताने जिंकेल असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.