७२ मिटर लांब तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न
भारत माता की-जय, वंदे मातरम या जय घोषात तिरंगा पदयात्रा संम्पन, रावेर येथे प्रथमच ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ७२ मिटर लांब तिरंगा पदयात्रेचे योजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या पदयात्रेचे सुरुवात सरदार जी.जी.हायस्कूल, रावेर येथून प्रमुख वक्ते प्रमोद कराड (अभाविप कोकण प्रांत पूर्व प्रदेश मंत्री) अभाविप शहराध्यक्ष युवराज माळी शहर मंत्री अभिजीत लोणारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.
पदयात्रा सरदार जी.जी. हायस्कूल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैक - हेडगेवार चैक-महात्मा फुले चैक मार्गे अंबिका व्यायाम शाळा या ठिकाणी पदयात्रेचा समारोप जाहीर सभेत झाला. या जाहीर सभेला प्रमोद कराड यांनी संबोधित केले या वेळी व्यासपीठावर तहसीलदार विजयकुमार ढगे,रा.स्वं.संघ तालुका संघचालक लखमजी पटेल, विद्यार्थी परिषद शहर अध्यक्ष युवराज माळी व शहरमंत्री अभिजित लोणारी हे होते. जाहीर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. रावेर शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातुन हजारोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनीं व नागरीक उपस्थित होते.https://youtu.be/EQ2cjR9HzDA