१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद ५०० लोकांनी लुटला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जकसन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड नावाचा अधिकारी त्यावेळी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता. त्याचेच नाव या इंजिनला देण्यात आले. इंग्लडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली. त्याच्या दिमतीला सिंध, सुलतान आणि साहिब या नावांची तीन इंजिने होती.१८३० मध्ये जगातील पहिली रेल्वे सुरु झाली. त्यानंतर केवळ चौदा वर्षात भारतात रेल्वे आली.
गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांनी या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. पण त्यांच्या पत्नी मात्र या समारंभास उपस्थित होत्या.
... आणि १६ एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे भासत होते. काळे पोषाख घातलेले इंजिनाच्या पोटात असलेले खलाशी ,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क चालू लागली. लोक बोलू लागले की , पुराणकाळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रजांचा राजा देवाचा अवतार , अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोकभयचकित तर झालेच , पण गायी , बैल भेदरले आणि कुत्रे पिसाळल्यासारखे भुंकू लागले. एकीकडे लष्करी बँडही निनादत होता. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता.
बोरीबंदर-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्याकाळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली.
तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटे आगीची गाडी बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली. तर असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला दैवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले , 'चाक्या म्हसोबा '. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.
अठराव्या शतकात लोक जात-पात, धर्म, अंधश्रद्धा, अज्ञानाच्या भोव-यात अडकलेले होते. पहिली रेल्वे सुरू करताना ब्रिटिश सरकारला वाटत होते की. त्या काळात भुकेकंगाल म्हणून ओळखले जाणारे भारतातील रहिवासी रेल्वेचे तिकीट खरेदी करतील का, अस्पृश्यांची सावलीही अंगावर पडू न देणारे भारतीय उच्च-नीचतेचा भेद विसरून एकत्र प्रवास करतील का, मात्र, तत्कालीन मुंबई-ठाण्यातल्या लोकांनी रेल्वे प्रवासाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ठाणे-मुंबई या मार्गावर आज पाऊण कोटी प्रवासी आहेत. रेल्वे ही आज जीवनवाहिनी ठरली आहे. पण १८५३ मध्ये रेल्वे सुरू करण्यात सर्वात मोठे योगदान नानाशंकरशेट यांचे आहे.आगगाडी सुरू झाल्यास मुंबईचं वैभव, वाहतूक व व्यापार वाढेल. त्यामुळे सरकारलाही फायदा होईल, अशी नानांची मते होती. १६ एप्रिलला धावलेल्या पहिल्या रेल्वेगाडीतून सुमारे २५ व्हीआयपींनी प्रवास केला. त्यामध्ये नानाशंकरशेट यांचा समावेश होता. रेल्वे सुरू होण्यासाठी नानांनी जे बहुमोल सहकार्य केले. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा बहुमान करण्यात आला होता.
भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. तेव्हापासून भारतीय रेल्वेचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या १६६ वर्षांत रेल्वेचा परीघ एवढा प्रचंड विस्तारला आहे की, भारतीय रेल्वे आज दंतकथेचा विषय झाली आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसर्या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७, ८५३ रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ७० हजार किलोमीटरपर्यंत जाते. हे अंतर पृथ्वीच्या एकूण परीघाच्या जवळपास दीडपट आहे.
रेल्वे हे क्रांतीचे प्रभावी हत्यार ठरले. इंग्रजांनी रेल्वे आणली ती त्यांच्या फायद्यासाठी. पुढे चारच वर्षांनी १० मे १८५७ रोजी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसमराला सुरुवात झाली. १८५७ चा उठाव दडपण्यासाठी रेल्वे ही फार मोठी शक्ती होती.त्यामुळे आणीबाणीच्या वेळी सैन्याचीही जलद हलवाहलव करता यावी यासाठी भारतात लोहमार्गाची किती आवश्यकता आहे हे स्पष्ट झाले.
सौजन्य : योगेश शुकला , जळगाव