प्रतिनिधी, औरंगाबाद
दि.२७/०२/२०१८
राज्य़ात 12 वी ची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे, मात्र यंदा 12 वीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परिणामी विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होणार आहे. 12 वी चे 4 पेपर्स आतापर्यंत झालेले आहेत, पण राज्यात एकाही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासण्यात आलेली नाही. कारण राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. संपूर्ण राज्यात हे बहिष्कार आंदोलन सुरु झाल्यानं यंदाचा 12 वीचा निकाल वेळेत लागणार नाही, तर यामुळे विद्यार्थी आणि पालकही आता चिंतेत आहेत. राज्यातल्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापूर विभागामध्ये 2200 प्राध्यापक तर राज्याभरातून 72 हजार प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय.
कला , वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधल्या उत्तरपत्रिका आता तपासणीविना पडून आहेत, त्यामुळे आता अधिनेशनाच्या काळात तरी या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होणार का? हे पहावं लागणार आहे. या मागणीसह इतर काही मागण्या घेऊन हे शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
नाशिक अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या चार जिल्ह्यातील सुमारे एक लाख ६९ हजार विद्यार्थी १२वी ची परिक्षा देत आहे . औरंगाबाद अंतर्गत सुमारे १लाख ४५हजार विद्यार्थी तर पुणे मधुन २लाख१२हजार विद्यार्थी परिक्षा देत आहेत.
निकाल लांबणीवर पडला तर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी ,वैद्यकीय प्रवेशास मुकावे लागेल हे निश्चित.
No comments:
Post a Comment