प्रतिनिधी नाशिक,
शहर वाहतूक शाखेकडून नवीन मोटार वाहन सुधारित कायद्याविषयक जनजागृती करण्यात सुरुवात
आडगाव येथील के.के.वाघ महाविद्यालयाजवळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जनजागृतीपर फलकाचे अनावरण करण्यात आलय. नवीन मोटार वाहन कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये फलक उभारले जातील. अस वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. तसेच मोटार वाहन कायद्यात नव्याने काही तरतुदी करण्यात आल्या आहेत , या कायद्याची अंमलबजावणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पुर्वी नाशिककरांमध्ये याविषयी जागरूकता यावी, यासाठी प्रबोधनपर फलक उभारण्यास प्रारंभ करण्यात आला आहेत. मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आलीये. जेणेकरून वाहनचालक वाहतूक नियमांचे अधिकाधिक पालन करण्यावर भर देतील, हा यामागील उद्देश आहे. ‘वाहतूक नियमांचे पालन करा, आपले पैसे वाचवा, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर आहे’ असा संदेश आणि दंडाच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे.