५ ते ८ सप्टेंबर ला दक्षिण कोरीया मध्ये होत आहे.
रबराची बाहली च्या नावाने प्रसिद्ध असलेली योगपटू श्रद्धा (मुधडा) लढ्ढा व त्यांची विद्यार्थीनी श्रावणी पाचखेडे या दोन्हीही ९ व्या एशियन योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिपसाठी ५ ते ८ सप्टेंबर २०१९ ला Yeosu Expo Convention Center, दक्षिण कोरीया येथे आयोजित स्पर्धेत सहभागासाठी रवाना झाल्यात.
यामध्ये एशिया खंडातुन सर्व गणमान्य व निवड झालेले योगपट महिला तसेच परूष स्पर्धक भाग घेणार आहेत. ही स्पर्धा अनिवार्य योगा, रिदमिक योगा , आर्टिस्टिक सिंगल / पेअर , प्रोफेशनल योगा तसेच फी फ्लोअर योगा सारख्या विभिन्न गटांमध्ये घेतल्या जाणार आहेत . संपुर्ण भारतातून जवळजवळ ४२ स्पर्धक वेगवेगळया गटांमध्ये तसेच वयाच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत . गतवर्षी ८ वी योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिप तिरूअनंतपुरम येथील जिमी जॉर्ज इनडोअर मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत कु . श्रद्धा (मुंधडा) लढ्ढा यांनी भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिले होते. तसेच अर्जेन्टिना येथे आयोजित वर्ल्ड योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिप-२०१८ मध्ये भारतातर्फे प्रतिनिधीत्व करून भारताला एक *सुवर्ण पदक* मिळवून दिले होते. आजतागायत श्रद्धा (मुधडा) लढ्ढा हिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक गोल्ड , सिल्व्हर , ब्राझ पदके मिळवून भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे. श्रद्धा (मुधडा) लढ्ढा ही एक उत्कृष्ट खेळाडू असून ती एक उत्कृष्ट योग प्रशिक्षकसुद्धा आहे . तिने खूप कमी वयामध्ये अनेक योगपटू तयार केले आहेत . योगपटू श्रावणी पाचखेडे ही ज्यावेळेस रोप मल्लखांब प्रशिक्षण घेत होती, तेव्हापासून तिला श्रद्धा (मुंधडा) लढ्ढा हिने विशेष लक्ष देवून योगाचे प्रशिक्षण दिले व आज ती आपल्या गुरूसोबत खांद्याला खांदा लावून भारताला ९ व्या एशियन योगा स्पोर्टस् चम्पियनशिप स्पर्धेमध्ये पदक मिळवून देण्याच्या निश्चयाने सहभागी होत आहे. योग क्षेत्रातील अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीसह कोरियात भारताचा झेंडा गाडण्यासाठी यादोघी अनेकांच्या शुभ आशीर्वादासह प्रवासाला निघाल्या आहेत.

No comments:
Post a Comment