वस्तू आणि सेवा कर प्रणालीत हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर ५ टक्के इतका कमी करण्यात आला असून याबद्दलची अधिसूचना निर्गमित होताच या कमी कर दराचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वित्तमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी केले. आज सह्याद्री अतिथीगृहात हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ( वेस्टर्न इंडिया) च्या प्रतिनिधींनी वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांची भेट घेऊन कर दर कमी केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत. ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत ठेवावी या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment