पुणे, ता. ११/११/२०१७ :
पुण्याच्या हडपसर परिसरात एका लहान मुलीने मसाल्यात पाणी सांडल्याच्या कारणावरून महिलेने तिला अनेक ठिकाणी चटके दिल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी आज शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गो-हे यांनी पोलिस अधिका-यांकडे केली. आज सायंकाळी त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेऴी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व महिला पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्याकडून केसबाबत व उपचारांची माहिती घेतली. आ. डॉ.गो-हे यांनी या प्रकरणात बंगलादेशींकडून होणारे काही अनैतिक मानवी व्यापार(ह्यमन ट्रॅफिकिंग)चा काही धागादोरा आहे का या दृष्टीने शहानिशा करण्याबाबत सूचना केली. काही काळापूर्वी अशीच एक सरोगसीची केस या परिसरात घडली होती. या घटनेतील सदर पीडित मुलीस योग्य त्या संस्थेत दाखल करावे,चुकीच्या हाती ताबा मिळू नये,दोषींवर योग्य कलमे लावून कायदेशीर कारवाई व्हावी अशा स्वरुपाची अपेक्षा आ. डॉ. गो-हे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी तक्रारकर्त्या रजनीश तिवारी यांना मिळाली नसल्याचे निदर्शनाला आणल्यावर ती पोलिसांनी त्वरित दिली. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,नगरसेविका प्राची आल्हाट, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी, शादाब मुलाणी, मनीषा वाघमारे,संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment