Search This Blog

Sunday, November 12, 2017

मी आहे लाभार्थी ची राष्ट्रवादी महीला आघाडी ने केली पोलखोल


 विविध वाहिन्यांवर झळकत असलेल्या राज्य शासनाच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई गुलाब पवार (मोहमुख, ता. कळवण) यांना सरकारने २०१५ मध्ये शौचालय, तर २०१७ मध्ये घरकुल मंजूर केले.

एवढेच नाही, तर स्वच्छतादूत असलेल्या या महिलेची ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केलीच पण त्यांना सहा महिन्यांचे मानधन दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा खराच आहे. या सर्व घडामोडींमुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली असून, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून महिलांची बदनामी करणारी वक्तव्ये थांबवावीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.


सहा महिन्यांपासून मानधन नाही
‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई पवार या महिला स्वच्छता भारत अभियानाच्या स्वच्छतादूत म्हणून काम करतात. मोहमुख पाड्यावरील १६८ कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्याचे त्या काम करतात. आतापर्यंत तेथे १५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत; परंतु स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून काम केल्याचे मानधन अजून दिले नसल्याचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगितले. सरकारने स्वच्छतादूत महिलेलाच ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केल्याची चलाखी केल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी वक्तव्य करताना कुठलीही माहिती न घेता बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे, हे लक्षात येते. तसेच राज्यकर्त्यांची महिलांविषयीची मानसिकता लक्षात येते, असा आरोप सौ. वाघ यांनी केला. वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देऊ, असेही त्या म्हणाल्या.

1 comment:

  1. रिक्त एटीएम कार्डसह श्रीमंत व्हा, व्हाट्सएप: +१२६२३५५८२८५. दररोज $3000

    अरे मुलांनों!!! माझी निष्ठा आहे. माझे रिक्त एटीएम कार्ड दररोज $5,000 काढू शकते. मला हे गेल्या बुधवारी मिस्टर जॉर्जकडून मिळाले आणि आता माझ्याकडे €10,000 विनामूल्य आहेत. कार्डने कोणत्याही एटीएममधून पैसे काढले आणि नाव नाही, ते सापडत नाही आणि आता माझ्याकडे आणि माझ्या 4 मुलांसाठी पुरेसे पैसे आहेत. मी रोमांचित आहे मी मिस्टर जॉर्जला भेटलो कारण मी यापूर्वी दोन लोकांना भेटलो होतो आणि ते घोटाळे आहेत हे माहीत नसताना माझे पैसे घेतले. पण मी आता आनंदी आहे. मिस्टर जॉर्ज यांनी DHL द्वारे कार्ड पाठवले आणि मला ते दोन दिवसात मिळाले. आता त्याच्यापैकी एक मिळवा. पहा, ते लोकांना मदत करण्यासाठी देत आहे, जरी ते बेकायदेशीर असले तरीही, ते खूप मदत करते आणि कोणीही कधीही पकडले जात नाही. हे कार्ड जगभरातील सर्व देशांमध्ये कार्य करते. त्वरा करा आणि georgbednorzhackers@gmail द्वारे ईमेल करा. com मजकूर, कॉल किंवा WhatsAp: +1(262)355-8285
    देऊ केलेल्या इतर सेवा होत्या:
    एटीएम कार्ड क्लोनिंग
    मालवेअर कार्डसह बिटकॉइन एटीएम हॅक करणे
    हरवलेली किंवा चोरी झालेली क्रिप्टोकरन्सी पुनर्प्राप्त करणे
    वेस्टर्न युनियन ट्रान्सफर, मनीग्राम ट्रान्सफर, बँक ट्रान्सफर, पेपल ट्रान्सफर, कॅश ॲप ट्रान्सफर हॅक करणे
    हॅक केलेले सोशल मीडिया पुनर्प्राप्त करा: फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, जीमेल, याहू मेल आणि वेबसाइट्स.

    ReplyDelete