Search This Blog

Wednesday, September 4, 2019

आपले पैशे वाचवा वाहतूक पोलिसांची नजर तुमच्यावर आहे ...!

प्रतिनिधी नाशिक,
शहर वाहतूक शाखेकडून नवीन मोटार वाहन सुधारित कायद्याविषयक जनजागृती करण्यात  सुरुवात
 आडगाव येथील के.के.वाघ महाविद्यालयाजवळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जनजागृतीपर फलकाचे अनावरण करण्यात आलय.  नवीन मोटार वाहन कायद्याविषयी माहिती व्हावी, यासाठी शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये  फलक उभारले जातील. अस वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे. तसेच मोटार वाहन कायद्यात नव्याने काही तरतुदी करण्यात आल्या आहेत , या कायद्याची अंमलबजावणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तत्पुर्वी नाशिककरांमध्ये याविषयी जागरूकता यावी, यासाठी प्रबोधनपर फलक उभारण्यास प्रारंभ करण्यात आला आहेत.  मोटार वाहन कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आलीये. जेणेकरून वाहनचालक वाहतूक नियमांचे अधिकाधिक पालन करण्यावर भर देतील, हा यामागील उद्देश आहे. ‘वाहतूक नियमांचे पालन करा, आपले पैसे वाचवा, वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर आहे’ असा संदेश आणि दंडाच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे.

Tuesday, September 3, 2019

नाशकात सार्वजनिक गणेशोत्सवातुन 134 मंडळांनी घेतली माघार

प्रतिनिधी नाशिक,
 नाशिक विभागात 192 मंडळांपैकी केवळ 158 गणेश मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. तसेच लहान मंडळांची संख्या देखील 97 ने घटली आहे . यंदा 501 लहान मोठ्या मंडळांची नोंद पोलिसांकडे झलिये. नाशकात विविध शासकिय नियम दिवसेंदिवस कठोर होउ लागले आहेत.
परिसरातून मंडळांना मिळणारी देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी माघार घेतलीये. मागील वर्षी ८२९ लहान-मोठ्या मंडळांची संख्या होती. तसेच एकूण ६९५ मंडळांची पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेकडे नोंद झालीये. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद  तरूणाईचा गगनात मावेनासा असतो. तरूणाई मोठ्या आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असतात. दरवर्षी अनेक तरूण  सार्वजनिक गणेशोत्सवात हिरहिरीने भाग घेत असतात . विविध सामाजिक, राजकिय विषयांवरील प्रबोधनपर देखावे असो किंवा आकर्षक आरासची सजावट करून आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना मंडळांकडून करण्यात येते. कोल्हापूर आणि सांगली येथे झालेल्या पूर परिस्तिथी पाहता नाशिक मधील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्या मंडळांची काही रक्कम पाठवल्याचे कळते.
 - पल्लवी क्षिरसागर, नाशिक

Monday, September 2, 2019

पहूर येथे वाघूर नदीत बैल जोडी वाहून जात असताना बैलांचा मृत्यू तर शेतकरी बचावला

प्रतिनिधी पहूर,
येथील शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील वय 30 हा आपल्या नेहमीप्रमाणे वाघूर नदीतून  काठावर असलेल्या शेतात बैलजोडी घेऊन जात असताना बैलगाडी सहित डोहात वाहून जात असताना काही नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन्ही लोक हेसुद्धा दुखत असताना या तिघांना उपस्थित असलेल्या काही तरुणांनी वाचवले.
सविस्तर माहिती अशी की आज नऊ वाजता येथील शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील हे आपले नेहमीप्रमाणे वाघुर नदीच्या काठावर असलेल्या शेतात बैलगाडी घेऊन शेतात जात असताना वाघुर नदीच्या अर्थ भागी गाडी आली असता पाण्याच्या प्रभावाने बैलगाडी सहित शेतकरी रवींद्र तुळशीराम पाटील डोहा  कडे वाहून जात असताना तेथील काही नागरिकांनी आरडाओरड केल्याने तिथे उपस्थित असलेले पलेश देशमुख सागर जो माळकर या दोघांनी रवींद्र पाटील व बैलजोडीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता हे दोघेही प्रवाहाच्या पाण्याने डुंबत  असताना तेथील नागरिकांनी आरडाओरड केल्याने गावातील विठ्ठल किसन पांढरे व त्याचा मुलगा शुभम पांढरे गोकुळ उत्तम देशमुख या तिघांनी सागर जो मालकर रवींद्र पाटील पलेश देशमुख तिघांना वाचवले पण वाचवले असता बैल जोडी हे जागीच मृत्युमुखी पडली या तिघांना पहूर  ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता प्राथमिक उपचार करून सागर जो मालकर व परेश देशमुख यांना पुढील उपचारार्थ जळगाव सरकारी दवाखाना चालवले आहे तर शेतकरी रवींद्र पाटील येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे या तिघांची परिस्थिती चांगली असल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला गणेश चतुर्थीच्या दिवशी या घटनेमुळे सणावर विरहं पडण्याची शक्यता होती शेतकरी रवींद्र पाटील व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे या दोघींना प्राण वाचवणारे विठ्ठल पांढरे गोकुळ देशमुख शुभम पांढरे यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे

श्रध्दा लढ्ढा आणि श्रावणी पाचखेडे दक्षिण कोरीया येथे ९व्या एशियन योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिपसाठी रवाना

 ५ ते ८ सप्टेंबर ला  दक्षिण कोरीया मध्ये होत आहे.
रबराची बाहली च्या नावाने प्रसिद्ध असलेली योगपटू श्रद्धा (मुधडा) लढ्ढा व त्यांची विद्यार्थीनी श्रावणी पाचखेडे या दोन्हीही ९ व्या एशियन योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिपसाठी ५ ते ८ सप्टेंबर २०१९ ला Yeosu Expo Convention Center, दक्षिण कोरीया येथे आयोजित स्पर्धेत सहभागासाठी रवाना झाल्यात.
यामध्ये एशिया खंडातुन  सर्व गणमान्य व निवड झालेले योगपट महिला तसेच परूष स्पर्धक भाग घेणार आहेत.  ही स्पर्धा अनिवार्य योगा, रिदमिक योगा , आर्टिस्टिक सिंगल / पेअर , प्रोफेशनल योगा तसेच फी फ्लोअर योगा सारख्या विभिन्न गटांमध्ये  घेतल्या जाणार आहेत . संपुर्ण भारतातून जवळजवळ ४२ स्पर्धक वेगवेगळया गटांमध्ये तसेच वयाच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत . गतवर्षी ८ वी योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिप तिरूअनंतपुरम येथील जिमी जॉर्ज इनडोअर मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत कु . श्रद्धा (मुंधडा) लढ्ढा यांनी भारताला सिल्व्हर मेडल मिळवून दिले होते. तसेच अर्जेन्टिना येथे आयोजित वर्ल्ड योगा स्पोर्टस् चॅम्पियनशिप-२०१८ मध्ये भारतातर्फे प्रतिनिधीत्व करून भारताला एक *सुवर्ण पदक* मिळवून दिले होते. आजतागायत श्रद्धा (मुधडा) लढ्ढा हिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक गोल्ड , सिल्व्हर , ब्राझ पदके मिळवून भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे. श्रद्धा (मुधडा) लढ्ढा ही एक उत्कृष्ट खेळाडू असून ती एक उत्कृष्ट योग प्रशिक्षकसुद्धा आहे . तिने खूप कमी वयामध्ये अनेक योगपटू तयार केले आहेत . योगपटू श्रावणी पाचखेडे ही ज्यावेळेस रोप मल्लखांब प्रशिक्षण घेत होती, तेव्हापासून तिला श्रद्धा (मुंधडा) लढ्ढा हिने विशेष लक्ष देवून योगाचे प्रशिक्षण दिले व आज ती आपल्या गुरूसोबत खांद्याला खांदा लावून भारताला ९ व्या एशियन योगा स्पोर्टस् चम्पियनशिप स्पर्धेमध्ये पदक मिळवून देण्याच्या निश्चयाने सहभागी होत आहे. योग क्षेत्रातील अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीसह कोरियात भारताचा झेंडा गाडण्यासाठी यादोघी अनेकांच्या शुभ आशीर्वादासह प्रवासाला निघाल्या आहेत.

भुसावळ विधानसभेसाठी डॉ. मधू राजेश मानवतकर होणार भाजपच्या उमेदवार...?

प्रतिनिधी भुसावळ,
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भुसावळ मतदार संघातुन डॉ मधू राजेश मानवतकर यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह आहेत.
विद्यमान आमदार संजय सावकारे  यांच्याबद्दल स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी, भुसावळ शहराचा रखडलेला विकास व नगरसेवकांमधील वाद, शहरात दिवसापरत होणारे गुन्हे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश, तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश बघता भुसावळ शहरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉ मधू मानवतकर यांचं नाव समोर येत असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजते.
डॉ मधू राजेश मानवतकर यांचा जन्म 22 जानेवारी 1974 चा डॉ. मधू मानवतकर यांचं शिक्षण वैदकीय पदवी एम बी बी एस, प्रसुतीशास्त्र डिजिओ झालेले आहे.
डॉ मधू मानवतकर यांना समाजकार्याची आवड असून महिलांच्या विविध आजारांचे तपासणी,निदान आणि उपचार भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, मलकापूर इत्यादी परिसरातील रुग्णांसाठी मोफत तसेच माफक दरात गुणवत्तापूर्ण वैदकीय सेवाशिबिर आयोजित केलेले आहेत.
प्रज्ञासुर्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसोबत नाळ जुडवून आहेत. जेसीआय मार्फत डॉ मधू मानवतकर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पंचविस मुलींच्या विवाहप्रसंगी त्यांना संसारापोयोगी  वस्तूंचा संच भेट म्हणून देणे तसेच अनेक विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा खर्च देखील उचला आहे.

Saturday, August 31, 2019

अंगणवाडीचा पोषण आहार चोरट्या मार्गाने बाजारात विक्री

प्रतिनिधी मुक्ताईनगर,
            भारतात अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्यातील एक समस्या "बाल कुपोषनातून बाल मृत्यु" ही समस्या आजही तितकीच जटिल आहे ह्या साठी शासन स्तरावरून नेहमी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात राज्याच्या महिला व बाल विकास विभागा कडून मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी त्यांना राज्यातील अंगणवाडीन मार्फत पोषण आहार दिला जातो
 पण ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्यात चिरी मिरी होऊन त्यात काळाबाजार होतो. व त्यामुळे मूल पोषण आहारापासून वंचीत राहून कुपोषनाचे प्रमाण वाढते, मुक्ताईनगर(जळगाव) तालुक्यात ह्या पोषण आहाराची चोरट्या मार्गाने विक्री होत असून शासकीय अधिकारी कुंभकर्ण  अवस्थतेत असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.कोणी किती पोषण आहार फस्त केला याची चौकशी आता शासन स्तरावरुन कशी होणार संमधितांवर काय कार्यवाही होणार याकडे पोषण आहारा पासून वंचीत बालक व त्यांचे पालक यांचे लक्ष लागून आहे.

Thursday, August 29, 2019

आय.पी.इन्वेस्टिगेशन टीम कडून प्रकाशा (ता.शहादा) व अक्कलकुवा येथे नकली संभाजी बिडी व नकली 30 नंबर बिडी वर छापा टाकून नकली माल मोठ्याप्रमाणात हस्तगत करण्यात आला

प्रतिनिधी  नंदूरबार,
आय.पी. इन्वेस्टिंगेशन ला बिडीच्या बनावट मालाविषयी मिळालेला माहितीनुसार सदर बाब नंदुरबार चे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या निदर्शनास आणून स्थानिक गुन्हाशाखेचे कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात हाजीपार पानसेंटर प्रकाशा (ता.शहादा) येथे छापा टाकून संभाजी बिडी चा बनावट माल मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात येऊन ह्या संमधी दुकान मालक अनिस मुसा मेमन याला ताब्यात घेण्यात आले,

 त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा माल अक्कलकुवा येथून आणल्याचे आय.पी. ला समजले , त्यानंतर संमधित आरोपीला ताब्यात घेऊन अक्कलकुवा पोलीस स्टेशन ला नेऊन संमधीत घटनेची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी यांना देण्यात आली व पुन्हा आय.पी.इन्वेस्टिंगशन अधिकारी,जिल्हा गुन्हा शाखेचे कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिस मुसा मेमन याने दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा येथील  श्री गणेश प्रोव्हीजण (परदेशी गल्ली) येथिल दुकानात छापा टाकण्यात आला सदरहु दुकानातून आय.पी. अधिकाऱ्यांना नकली संभाजी बिडी व नकली 30 नंबर बिडी मोठ्या प्रमाणात आढळून आली, त्यानंतर माल हस्तगत करून मालाचा पंचनामा करण्यात आला व दुकान मालक विनोद भगवानदास बनिया यास ताब्यात घेऊन अक्कलकुवा पोलीस स्टेशनला संमधितांवर नकली संभाजी बिडी व नकली 30 नंबर बिडी विकल्या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला. ह्या वेळी वरिष्ठ आय.पी.अधिकारी अनिल बी. मोरे,आय.पी.अधिकारी अशोराज एस.तायडे, गुन्हा शाखेचे प्रवीण राजपूत, किरण पावरा, स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

मानवतकर दांपत्याकडून मुख्यमंत्री निधीस मदत

प्रतिनिधी भुसावळ,
येथील डॉ . मधू मानवतकर व डॉ . राजेश मानवतकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तासाठी एक लाख रुपये किमतीचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी मा . मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे  सुपूर्द केला . अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भुसावळ येथील डॉ . राजेश मानवतकर व डॉ . सौ . मधु मानवतकर यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय भाग घेतला आहे .
गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अफाट जनसंपर्क असलेले डॉक्टर मानवतकर दांपत्य डॉ . मानवतकर बहुउद्देशिय संस्थेव्दारा जनप्रबोधन व जनकल्याण हेतुने सतत समाजकार्य करीत आले आहेत . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक लाखाची मदत केली आहे . महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिनांक २४ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरात आले होते . मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानवतकर दांपत्यांने एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे दिला . या प्रसंगी झालेल्या सदिच्छा भेटीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दांपत्याशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले .

Wednesday, August 28, 2019

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराला कांस्यपदक

नवी दिल्ली
रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहेत.

रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी 48 सदस्यीय भारताच्या चमूने  विविध कौशल्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 1 सुवर्ण ,1 रजत ,2 कांस्य पदक आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई केली आहे. यात महाराष्ट्र कन्या श्वेता रतनपुराने उत्तम कामगिरी करत ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी मध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. तुषार फडतरे याने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये तर ओंकार गुरव याने मोबाईल रोबोटिकमध्ये प्रत्येकी उत्कृष्ट पदक मिळविली आहेत.
      

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत एकूण 63 देशातील 1 हजार 350 स्पर्धकांनी  एकूण 53 कौशल्य प्रकारात सहभाग घेतला होता. भारताने 1 सुवर्ण ,1 रजत ,2 कांस्य आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई करत या स्पर्धेत 13 वे स्थान मिळविले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडीसाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या वतीने दिल्लीत  ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सर्वाधिक 23 पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. या स्पर्धेत तुषार फडतरे याने सुवर्ण तर श्वेता रतनपुरा आणि ओंकार गुरव यांनी रजत पदकाची कमाई केली होती.

स्वस्त घरांचा एक टक्का झाल्याने घरे स्वस्त - सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री

प्रतिनिधी मुंबई,
महानगरातील 60 चौ.मी. चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील 90 चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर 8 टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने  अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

वस्तू आणि सेवा कर परिषदेने गृहनिर्माण क्षेत्रावरचा कराचा भार कमी केल्याने सर्वसामान्य माणसाचे हक्काचे घर असण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत झाली आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जीएसटी आधी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर व्हॅट आणि सेवाकर आकारला जात असे. वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आल्यानंतर या क्षेत्रासाठी पूर्वीच्या करांचा एकत्रित भार घेऊन नवीन दर निश्चित करण्यात आला होता. परंतु सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न आणि या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन गृहनिर्माण क्षेत्रावरील कराचा बोजा कमी करण्यात आला.

गृहनिर्माण क्षेत्रासाठी कराचा बोजा कमी करण्याचा शासनाने व वस्तू आणि सेवा कर परिषदेने प्रयत्न केला आहे. याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहेअसेही अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

परवडणाऱ्या घरांव्यतिरिक्त बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील कराचा दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी कमी किंमत मोजावी लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त झाली असून या क्षेत्राच्या वाढीसाठी चालना मिळाली असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

निवासी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी

निवासी सोसायटींना पूर्वी 5 हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारल्यास वस्तू आणि सेवा कर द्यावा लागत असे. आता नवीन बदलामुळे 7500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक देखभाल शुल्क असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना वस्तू आणि सेवाकर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जमीन मालकाने टीडीआर,एफएसआय किंवा लाँग टर्म लिज द्वारे  संबंधित हक्क हस्तांतरीत करून या जमिनीवर बांधण्यात आलेली घरे जर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी विक्री करून त्यावरील कर भरला असेल तर टीडीआरएफएसआय अथवा दीर्घकालीन भाडे करारांवर वस्तू आणि सेवा कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळेही घरांच्या किंमती कमी होण्यास मदत होत असल्याचे वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

नागपूरच्या बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टीधारकांना मुद्रांक शुल्कात सवलत

नागपूरच्या मौजा बिनाकी येथील बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या दस्तावरील मुद्रांक शुल्कामध्ये लोकहितास्तव 80 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे रहिवाशांना केवळ 20 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

नागपूरच्या नाईकवाडी येथील नागनाथ बळवंत काळे यांच्या ख.क्र. 108/1 आणि ख.क्र. 108/2 व मौजा बिनाकी ख. क्र. 55 येथील मालकीच्या एकूण 13.81 हेक्टर इतक्या वडिलोपार्जीत जमिनीवरील बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी आजचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या जमिनीच्या मालकाकडून होणाऱ्या हस्तांतरण संलेख तथा दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (ब) अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क लोकहितास्तव 80 टक्के इतक्या मर्यादेपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यानुसार आकारणीयोग्य असलेल्या एकूण मुद्रांक शुल्काच्या 20 टक्के इतकीच रक्कम भरावी लागणार आहे.

मुद्रांक शुल्काची ही सवलत या जमिनीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या 22 जानेवारी 2019 रोजीच्या मंजूर अभिन्यास नकाशातील मिळकतीला लागू राहील. आजच्या निर्णयानुसार ज्या रहिवाश्यांच्या नावाने हस्तांतरण दस्त होणार आहेत असे रहिवासी हे बिनाकी हाऊसिंग स्किममधील झोपडपट्टीतील रहिवासी असल्याचे नागपूर महानगरपालिकेने प्रमाणित करणे आवश्यक आहे. अशा लाभार्थ्यांची प्रमाणित यादी नागपूर महानगरपालिकेकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आजचा निर्णय शासन राजपत्रात अधिसूचित होऊन प्रसिद्ध होण्यापूर्वी हस्तांतरण दस्ताशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने मुद्रांक शुल्काचा भरणा शासनाकडे केला असल्यास त्यांना त्याचा परतावा मिळणार नाही.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने अध्ययन व संशोधन केंद्र स्थापनेस मान्यता

जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राची स्थापना करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या केंद्रामुळे खान्देशातील या थोर कवयित्रीचे साहित्य व्यापक पातळीवर प्रसारित होण्यास मोठी मदत होणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या साहित्याच्या अभ्यासाबरोबरच ते जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठी विविध विद्यापीठांशी करार करून भरीव प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात बहिणाबाईंच्या जीवनाविषयी तसेच त्यांच्या साहित्याविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे. लेवाबोली समाजसंस्कृती आणि समाजजीवन यांच्या समग्र अभ्यासासही या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.

खान्देशातील साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासासोबत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी 1 कोटी 63 लाखाच्या अनावर्ती आणि 27 लाख 22 हजारांच्या आवर्ती खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आश्रमशाळेतील मुलांना मिळणार इंग्रजीतून धडे -डॉ अशोक उईके आदिवासी विकास मंत्री

प्रतिनिधी मुंबई
 आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय आश्रमशाळांचे रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. उईके म्हणालेपहिल्या टप्प्यात 50  शासकीय आश्रमशाळांमध्ये पहिली इयत्तेपासून इंग्रजी आणि सहावी इयत्तेपासून सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षणाचे धडे गिरवले जाणार असून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होणार आहे.

महाराष्ट्रातील दुर्गम भागात आदिवासींच्या प्रगतीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत 502 शासकीय आश्रमशाळा सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्यात येते. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते बारावी शिक्षण मोफत देण्यात येते. या योजनेअंतर्गत 179 शाळांमध्ये 54 हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

गेल्या काही वर्षात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी पालकांचा कल वाढला आहे. यासाठी विभागामार्फत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळेतच आदिवासी विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आयएसओ मानांकन मिळालेल्या किंवा इतर चांगल्या शासकीय आश्रमशाळांचे रुपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्यात येणार आहे. यासाठी सदर आश्रमशाळेत करडी पथ उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. त्याशिवाय शाळा इमारत,वसतिगृहवीजदळणवळण,ग्रंथालयप्रयोगशाळासंगणक कक्ष,क्रीडांगण अशा मुलभूत सुविधा असलेल्या आश्रमशाळा इंग्रजी माध्यमासाठी निवड करण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार 2019-20 या वर्षात शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पहिली इयत्तेपासून इंग्रजी माध्यमात प्रवेश घेता येणार आहे. तसेच इयत्ता सहावीपासून गणित आणि विज्ञान विषय मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून शिकता येणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यात 7नाशिक जिल्ह्यात 26अमरावती जिल्ह्यात 13नागपूर जिल्ह्यात 13 आश्रमशाळेत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करण्यात येणार आहे.

या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले पदवीधारक उमेदवार यांची शिक्षक म्हणून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करून गुणवत्ता धारक शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

शासकीय आश्रमशाळेचे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्यात येत असल्याने भविष्यात उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थी मागे राहणार नाहीत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी,तंत्रशिक्षणवैद्यकीय शिक्षण घेणे सोपे होणार आहे. यामुळे शिक्षणाच्या वाढत्या स्पर्धेत ते स्वतःला सिद्ध करू शकतील असे डॉ. उईके यांनी सांगितले.

एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम
                                                           महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरु असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. उईके म्हणालेसध्या सहावी इयत्तेपासून सुरु असलेला सीबीएसई अभ्यासक्रम पहिली इयत्तेतच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमाचे आकलन सोपे होणार आहे. सन 2019-20 या वर्षात पहिल्या टप्प्यात 16 व त्यानंतर उर्वरित एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग सुरु करण्यात येणार असल्याने प्रत्येक वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे. पहिली इयत्तेपासूनच आदिवासी विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचा लाभ घेता येणार असल्याने या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा अधिक सुकर होणार आहेत. शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी या शाळेतील शिक्षक भरती प्रक्रिया काटेकोर होण्यासाठी नामवंत शिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरु केल्या. 2001 ते 2019 पर्यंत 25 एकलव्य निवासी शाळा सुरु असून  इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन,निवास व्यवस्थाअंथरूणवह्या पुस्तकेगणवेशलेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येतात. नाशिकनागपूरअमरावती,पालघरगडचिरोलीनंदुरबार,गोंदियाधुळेनांदेडठाणेचंद्रपूर,यवतमाळअहमदनगर या जिल्ह्यात एकलव्य निवासी शाळा सुरु आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीसीई अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देण्यात येत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. दुर्गम भागात असणाऱ्या या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले चांगल्या दर्जाचे शिक्षक उपलब्ध होण्यासाठी राज्यराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे,विविध संकेतस्थळेनामवंत राष्ट्रीय संस्थाविद्यापीठे येथे शिक्षक भरतीविषयी जाहिरात प्रसिद्धी करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या गुणवत्ताधारक  उमेदवारांची पारदर्शकपणे शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीपासून उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीतंत्रशिक्षणवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.

औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार - डॉ. अनिल बोंडे कृषिमंत्री

प्रतिनिधी मुंबई
केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डॉ. बोंडे यांची भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले,राज्यात पान पिंपरीशतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच राज्यातील काही भागात चंदनाचेदेखील उत्पादन घेतले जाते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.  चंदन व औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी केंद्र शासनाच्या आयुष अभियानांतर्गत प्रति हेक्टरी 58 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. ते त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Tuesday, August 27, 2019

हुतात्मा एक्सप्रेस आजपासून नव्या रुपात!

प्रतिनिधी पुणे,
रेल्वे हळू हळू आपली जुनी कात टाकत नाविन्याचा स्वीकार करत आहे.



आता रेल्वेने भुसावळ पुणे धावणारी हुतात्मा एक्सप्रेस 11025/26 चे आधुनिकरण केले आहे. ज्यामुळे  प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, रेल्वेने हुतात्मा एक्सप्रेस च्या बैठक व्यवस्थेत, शौचालय मध्ये मोठे बदल केले आहे, प्रवासात प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे या साठी प्रत्येक कोच मध्ये शुध्द पाण्याचे मशीन बसवले आहेत ज्या मुळे प्रवाशांना शुद्ध पाणी मिळेलच पण त्यांची आर्थिक बचतही होईल. याबाबद्दल आमच्या प्रतिनिधी यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला असता प्रवाशांनी ह्या गाडीचं मनापासून स्वागत केले आहे. पण काही प्रवाशांनी जनरल बोगी ची संख्या वाढवल्यास गरीब लोकांनचा प्रवास ही सुखकर होईल अस मत मांडले आहे तर काही प्रवाशांनी स्लीपर कोच वाढवल्यास रात्रीच्या प्रवास ही सुखकर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली, आता बघुयात रेल्वे प्रशासन ह्या नूतनीकरना सोबत प्रवाशांनच्या ह्या मागण्याकडे किती गांभीर्याने बघते.

Monday, August 26, 2019

प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 प्रतिनिधी  मुंबई,
प्रथम वर्ष पदवी व्यावसायिकतांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूरसांगलीसाताराकोकण सह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती विनित सरन यांच्या खंडपीठासमोर आज यासंदर्भात सुनावणी झाली. सुनावणी नंतर २०१९-२०२० च्या शैक्षणिक वर्षाकरिता पदवी व्यावसायिक,तांत्रिक अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये प्रवेश घेता येतील. सीईटी विभागाला तशा स्वरुपाचे निर्देश देण्यात आले असूनसदर सूचना सीईटी सेल च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. या राज्यातील पूरग्रस्त स्थितीनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ होण्याची विनंती करणारी याचिका प्रवेश नियामक प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. परंतु आता ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्रवेश प्रकियेची मुदत वाढविल्यामुळे याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.

Sunday, August 25, 2019

१ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रीकेचे वाटप - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

प्रतिनिधी  मुंबई,
 जमिनीचे आरोग्य अबाधित राखतानाच एकात्मिक अन्नघटक व्यवस्थापनासाठी तसेच खतांच्या संतुलीत वापराकरिता माती आरोग्य पत्रिका योजना राबविली जात आहे. त्यानुसार गेल्या वर्षी राज्यातील एक कोटी 30 लाख शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

2015-16 पासून माती आरोग्य पत्रिका योजना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविली जाते. प्रमुख व सूक्ष्म अन्नघटकांसाठी माती परीक्षण प्रयोगशाळेत केले जाते. त्याचे विश्लेषण करुन शेतकऱ्यांना, माती आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाते. 2015-16 व 2016-17 या प्रथम टप्प्यात 28 लाख माती नमून्यांची तपासणी करुन 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांना आणि 2017-18 व 2018-19 या द्वितीय टप्यात 28 लाख माती नमून्यांची तपासणी करुन 1 कोटी 30 लाख 53 हजार शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे संकलित झालेल्या माहितीनुसार खरिप 2019 मध्ये प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकनिहाय मुख्य मुलद्रव्यांचे मोबाईल संदेश देण्यात आले.

राज्यात सध्या माती परीक्षणासाठी शासकीय 31 तर योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या नोंदणीकृत अशासकीय 224 अशा एकूण 225 माती चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची नमूने तपासणीची वार्षिक क्षमता सुमारे 21 लाख आहे, असे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या सूचनेनूसार या वर्षापासून माती आरोग्य पत्रिका योजनेत बदल करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करुन त्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील माती नमुन्यांची तपासणी करुन माती आरोग्य पत्रिका वितरीत करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.


या पथदर्शी प्रकल्पात राज्यातील सर्व 351 तालुके निवडण्यात आले आहेत. त्यातील 351 गावांमध्ये 1 लाख 84 हजार खातेदारांचे 2 लाख 8 हजार माती नमुने तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.  माती आरोग्य पत्रिकेचे वितरण क्षेत्रीय पातळीवरील विस्तार यंत्रणेमार्फत करण्यात येते. मूलद्रव्यांची कमतरता असलेल्या निवड झालेल्या प्रत्येक गावात 50 हेक्टर क्षेत्रात प्रात्यक्षिके राबवली जाणार आहेत. यासाठी प्रतिहेक्टर 2500 रुपये अनुदान दिले जाणार आहे. गावांमध्ये शेतकरी मेळावे आयोजित करुन माती आरोग्य पत्रिकेत नमूद केलेल्या बाबींवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ - नारायण मूर्ती

प्रतिनिधी  गोरखपूर
इन्फोसिसचे सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. मागील 300 वर्षातील हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा सर्वोत्तम काळ आहे.
पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतक्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वातावरणात उभी आहे. या परिस्थितीत भारतातील गरिबी दूर करण्याची संधी आहे. देशातील गरिबी दूर करत प्रत्येक भारतीयासाठी उत्तम भविष्यकाळ निर्माण करण्याची संधी सध्याच्या अर्थव्यवस्थेत आहे, असे मत नारायण मूर्ती यांनी गोरखपूर येथील मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका पदवी प्रदान समारंभात व्यक्त केले आहे. जर आपण प्रयत्न केले तर आपण महात्मा गांधीजींच्या इच्छेनुरुप देशातील गरिबांचे अश्रू पुसू शकू. 'मेरा भारत महान'चा नारा देणे सोपे आहे मात्र चांगल्या मूल्यांना आचरणात आणणे खूप कठीण असते. देशभक्तीचा खरा अर्थ म्हणजे आपण प्रत्येक भारतीयाकडून सर्वोत्तम कसे मिळवू शकतो. भारताची अर्थव्यवस्था 6 ते 7 टक्के विकासदराने विस्तारते आहे. भारत हा जगाचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केंद्र झाला आहे. आपली परकी गंगाजळीसुद्धा 400 अब्ज डॉलरच्या वर पोचली आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. तर दुसरीकडे शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. देशातील 35 कोटी नागरिकांना लिहिता किंवा वाचता येत नाही. 20 कोटी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. 75 कोटी भारतीयांना स्वच्छतेशी आणि आरोग्याशी संबंधित सुविधा उपलब्ध नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आपण जगात बरेच मागे आहोत. या मुद्द्यांवर भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत यावेळी नारायण मूर्ती यांनी मांडले.

खासगी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे.

 मोदी सरकारच्या नव्या आदेशानंतर खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 24 हजार रुपयांपेक्षा कमी होणार नाही. एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना महिन्याला 24 हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम देत असेल तर तक्रार मिळाल्यानंतर सरकार त्या कंपनीविरूद्ध थेट कारवाई करू शकते.
याचा अर्थ असा की आता कमी पगारावर अधिक काम असलेल्या कंपन्यांच्या कंपन्या येत आहेत. कमी पगार मिळण्यासाठी नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्याला कर्मचारी थेट अहवाल देऊ शकतील.
सरकारच्या वतीने कार्मिक व लोक तक्रार मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले आहे की कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात किमान वेतन देणे आवश्यक आहे आणि ज्या कंपन्या या संदर्भात तक्रारी घेतील त्यांची चौकशी केली जाईल आणि जे लोक मानदंडांचे पालन करीत नाहीत त्यांचे चौकशी केली जाईल. त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. बुधवारी लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना कार्मिक व लोक तक्रार मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, मोदी सरकारने २०१७ मध्ये किमान वेतन कायद्यात दुरुस्ती केली आणि ते 65 वर्षांनंतर झाले. किमान वेतनात 40 टक्के वाढ केली आहे. ते 18 हजार रुपयांवरून 24 हजार रुपये करण्यात आले आहे. यासाठी कायदा बनविण्यात आला आहे आणि जे लोक या कायद्याचे पालन करीत नाहीत त्यांच्या तक्रारीची चौकशी केल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जितेंद्र सिंह म्हणाले की त्यांचे सरकार महिला कर्मचार्‍यांच्या हिताकडे विशेष लक्ष देत आहे. पेरिनेटल रजा 12 आठवड्यांपासून 24 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. १ एप्रिल २०१ from पासून सरकारने सुलभ केलेली प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू केली. सार्वजनिक तक्रार मंत्री म्हणाले की त्यांचे सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. या वचनबद्धतेनंतर सरकारने गेल्या वर्षी पीएफमधील हिस्सा 12 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. कामगारांच्या सोयीसाठी एक पोर्टल देखील आहे ज्यामध्ये तक्रारी नोंदविल्या जाऊ शकतात. 
कंत्राटी नियुक्त्यांमध्ये आरक्षण देण्याच्या प्रश्नावर जितेंद्र सिंह म्हणाले की ज्या संस्थांमध्ये 45 दिवसांहून अधिक काळ नियुक्ती केली जाते अशा संस्थांमध्ये अशा सुविधा पुरविल्या जात आहेत, परंतु कंत्राटदार नेमणूक करतात तेथे आरक्षण लागू करणे शक्य नाही. . कंत्राटदार लोकांना त्यांच्या स्वत: च्या अनुसार रोजगार देतात.

Friday, August 23, 2019

गिरीश महाजन होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ?

प्रतिनिधी जळगाव,
आगामी निवडणूका लक्षात घेता भाजपा कडून संपुर्ण राज्यभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली जात आहे.
या यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला धुळे येथून सुरवात झाली ह्या वेळी एका खाजगी वृत्त वाहिनीला मुखमंत्र्यांनी मुलाखत दिली. मुलाखतीत बोलत असताना मुख्यमंत्री म्हणालेत "कदाचित माझा पुढचा प्रवास हा दिल्लीत असेल आणि पक्ष जे भूमिका मला देईल ती भूमिका मी पार पाडले" या वक्तव्यावरून असे संकेत मिळता आहेत की मुख्यमंत्री ह्या निवडणूकी नंतर कदाचित केंद्राच्या कॅबिनेट मध्ये जातील. जर असे झाले आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजप युतीचे सरकार आले तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार ? अशा अनेक शक्यता आता कार्यकर्ता मधून वर्तविला जात आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक ही ह्या गोष्टी कडे खूप गांभीर्याने बघत आहे. पण राजकीय वर्तुळातुन नामदार गिरीष महाजन यांचे नाव अग्रभागी आहे. त्या मागे विशेष असे कारण म्हणजे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात म्हणून देवेंद्र फडनवीसांचे वारसदार म्हणून गिरीष महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज जळगावात

 प्रतिनिधी जळगाव,
आगामी निवडणूका लक्षात घेता, भाजपा कडून महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  नेतृत्वाखाली संपुर्ण राज्य भर काढली जात आहे.या यात्रेच्या दुसऱ्या टप्यात जळगावातील जनतेशी मुख्यमंत्र्यानी संवाद साधत आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखा-जोखा मांडला.

 सुरवातीला सभेच प्रास्तवीक जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले. आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आजवर जो निधी दिला त्यामुळे शहराच्या विकासास खूप मदत झाली असे ह्या वेळी नमूद केले, हुडको प्रकराणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दलही त्यांनी मुखमंत्र्यांचे आभार मानले.

यानंतर राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष महाजन यांनी जनतेशी संवाद साधला  त्यावेळी ते बोलताना म्हणालेत "पाच वर्षांपासून आमचे सरकार जोरदार काम करत आहे.हेच काम मुख्यमंत्री महोदय महाजनादेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत आहे.राज्याच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडत आहे की एखादा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिला आहे. आम्ही काम चांगल करतो आहे ह्याची ही पावती आहे.राज्यात नव्हे तर देशात पहिल्यांदा मेडिकल हब आम्ही जळगावात सुरू केलय जेथून आता दरवर्षी 1 हजार डॉक्टर रुग्ण सेवेसाठी बाहेर पडतील, आमचे सरकार आपल्या कर्तव्यात यशस्वी झाले आहे. आज राष्ट्रवादीची अवस्था व्हेंटिलेटरवर झालीय काँग्रेस ची तर ती पण नाही, खरतर विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणून सुद्धा अपयशी ठरला आहे. यांची ही अवस्था बघून 30 ते 40 जागाच्या वर काँग्रेस राष्ट्रवादी चे आमदार निवडून येणार नाही अस भाकीतच मंत्री गिरीश महाजन ह्यांनी ह्या सभेत केल.

या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला. ह्या वेळी ते बोलताना म्हणालेत" ही संवादाची ,जनादेशाची यात्रा आहे, विरोधी पक्ष परीक्षेत नापास झाल्यावर evm मशीन ला दोष देतो पण आपण 15 वर्ष सत्तेत असताना माजोरी आणि जी मुजोरी केली त्याचा हा परिणाम आहे. हे ते विसरत आहे.माझा पेन नालायक होता म्हणून मी नापास झालो हे विरोधी मान्य करत नाही म्हणून जनता निवडणूकीत बरोबर मार्क्स देते.
अशोक चव्हाण आणि पवार साहेब म्हणतात ही तुमच्या पक्षात मेगा भरती कसली? पण मला त्यांना सांगावस वाटत आमच्या मेगा भरती पेक्षा तुमच्या मेगा गळती कडे तुम्ही लक्ष द्या. काँग्रेस ने 70 वर्षांपूर्वी कश्मीर संबंधात जी चूक केली होती ती आमच्या सरकारने दुरुस्त केली म्हणून ह्या 15 ऑगस्ट ला पहिल्यांदाच अखंड भारताने स्वतंत्रता दिवस साजरा केला आणि निश्चितच ही बाब आनंददायी आहे. बलशाली आणि समृद्ध भारतासाठी आम्हाला तुमची साथ हवीय अशा  शब्दात मुख्यमंत्र्यानी जनतेला साद घातली, ह्या वेळी मंचावर पालकमंत्री गिरिष महाजन,माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील,आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे,आमदार स्मिता वाघ,जि प अध्यक्षा उज्वला पाटील,आमदार हरिभाऊ जावळे, चंदुभाई पटेल,अशोक कांडेलकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, ललित कोल्हे,जितेंद्र मराठे,दीपक सूर्यवंशी, महेश जोशी,दीपक साखरे,नदंकिशोर महाजन,व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, August 22, 2019

तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी कोटपा कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश

प्रतिनिधी  मुंबई,  ‘स्वच्छ महाराष्ट्र’च्या धर्तीवर 'तंबाखूमुक्त महाराष्ट्र' निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण) नियमन कायद्यानुसार (कोटपा) कारवाईवर भर द्यावा. तसेच शाळांच्या शंभर मीटर परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या दुकानांवर केलेल्या कारवाईचा अहवाल दर महिन्याला देण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण) नियमन कायदा (कोटपा) च्या अंमलबजावणीसंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. पाटील म्हणालेग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हेमध्ये राज्यातील 24.4 टक्के प्रौढ हे तंबाखू खात असल्याचे तर 3.8 टक्के नागरिक हे सिगारेट ओढत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील वय वर्षे 15 ते 17 या गटातील तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत असून या वयोगटातील 5.5 टक्के तरुण हे तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.

कोटपा कायद्यानुसार शाळा व महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणे मनाई आहे. अशा दुकानांविरुद्ध कोणती कारवाई केलीकिती जणांना दंड ठोठावला याची माहिती दर महिन्याला सादर करावी. तंबाखूमुक्त शाळा अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये यासंबंधी जनजागृती करावी. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची मदत जनजागृतीसाठी घ्यावी. आरोग्य विभागाने तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल चित्रफित तयार करून ती शाळामहाविद्यालयांमध्ये दाखवावी.

हुक्का पार्लरमधील तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी उपद्रवाविरुद्धच्या भारतीय दंड संहिता कलम 268 नुसार कारवाई करता येईल कायाबद्दल विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याची सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केली.

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शाश्वत उपाययोजना करण्यात येत आहे. उत्कृष्ट काम केलेल्या विभागाचे व अधिकाऱ्यांचे कौतुक करून ठाणे,नागपूरपुणे या जिल्ह्यांमध्येही या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विनायक देशमुखउपसचिव अश्विनी सैनीआरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडेटाटा कॅन्सर हॉस्पिटलचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदीविशेष कार्यकारी अधिकारी सचिन कस्तुरेसंबंध फाऊंडेशनचे दीपक छिब्बादेवीदास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल,पोलीसशालेय व उच्च शिक्षण विभागउत्पादन शुल्क विभाग,बृहन्मुंबई महानगरपालिकाआरोग्य विभागअन्न व औषध प्रशासन यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, August 21, 2019

बुलडाण्याच्या मोनाली जाधवला जागतिक पोलिस क्रिडा स्पर्धेत दोन सुवर्णांसह तीन पदकं

प्रतिनिधी बुलढाणा,

चीनमध्ये नुकतीच जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतातील अनेक पोलीस सहभागी झाले होते. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली जाधव सहभागी झाल्या होत्या. मोनाली यांनी तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. 'टार्गेट आर्चरी'मध्ये मोनाली यांनी 720 पैकी 716 गुण मिळवित दोन सुवर्ण पदकं आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.