प्रतिनिधी भुसावळ,
येथील डॉ . मधू मानवतकर व डॉ . राजेश मानवतकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तासाठी एक लाख रुपये किमतीचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी मा . मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला . अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भुसावळ येथील डॉ . राजेश मानवतकर व डॉ . सौ . मधु मानवतकर यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय भाग घेतला आहे .
गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अफाट जनसंपर्क असलेले डॉक्टर मानवतकर दांपत्य डॉ . मानवतकर बहुउद्देशिय संस्थेव्दारा जनप्रबोधन व जनकल्याण हेतुने सतत समाजकार्य करीत आले आहेत . या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरातील संकटग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक लाखाची मदत केली आहे . महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिनांक २४ ऑगस्ट रोजी भुसावळ शहरात आले होते . मुख्यमंत्री साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन मानवतकर दांपत्यांने एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे दिला . या प्रसंगी झालेल्या सदिच्छा भेटीत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दांपत्याशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले .

No comments:
Post a Comment