प्रतिनिधी जळगाव,
आगामी निवडणूका लक्षात घेता, भाजपा कडून महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण राज्य भर काढली जात आहे.या यात्रेच्या दुसऱ्या टप्यात जळगावातील जनतेशी मुख्यमंत्र्यानी संवाद साधत आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखा-जोखा मांडला.
सुरवातीला सभेच प्रास्तवीक जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले. आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी आजवर जो निधी दिला त्यामुळे शहराच्या विकासास खूप मदत झाली असे ह्या वेळी नमूद केले, हुडको प्रकराणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दलही त्यांनी मुखमंत्र्यांचे आभार मानले.
यानंतर राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष महाजन यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलताना म्हणालेत "पाच वर्षांपासून आमचे सरकार जोरदार काम करत आहे.हेच काम मुख्यमंत्री महोदय महाजनादेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत आहे.राज्याच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडत आहे की एखादा मुख्यमंत्री पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिला आहे. आम्ही काम चांगल करतो आहे ह्याची ही पावती आहे.राज्यात नव्हे तर देशात पहिल्यांदा मेडिकल हब आम्ही जळगावात सुरू केलय जेथून आता दरवर्षी 1 हजार डॉक्टर रुग्ण सेवेसाठी बाहेर पडतील, आमचे सरकार आपल्या कर्तव्यात यशस्वी झाले आहे. आज राष्ट्रवादीची अवस्था व्हेंटिलेटरवर झालीय काँग्रेस ची तर ती पण नाही, खरतर विरोधी पक्ष विरोधी पक्ष म्हणून सुद्धा अपयशी ठरला आहे. यांची ही अवस्था बघून 30 ते 40 जागाच्या वर काँग्रेस राष्ट्रवादी चे आमदार निवडून येणार नाही अस भाकीतच मंत्री गिरीश महाजन ह्यांनी ह्या सभेत केल.
या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला. ह्या वेळी ते बोलताना म्हणालेत" ही संवादाची ,जनादेशाची यात्रा आहे, विरोधी पक्ष परीक्षेत नापास झाल्यावर evm मशीन ला दोष देतो पण आपण 15 वर्ष सत्तेत असताना माजोरी आणि जी मुजोरी केली त्याचा हा परिणाम आहे. हे ते विसरत आहे.माझा पेन नालायक होता म्हणून मी नापास झालो हे विरोधी मान्य करत नाही म्हणून जनता निवडणूकीत बरोबर मार्क्स देते.
अशोक चव्हाण आणि पवार साहेब म्हणतात ही तुमच्या पक्षात मेगा भरती कसली? पण मला त्यांना सांगावस वाटत आमच्या मेगा भरती पेक्षा तुमच्या मेगा गळती कडे तुम्ही लक्ष द्या. काँग्रेस ने 70 वर्षांपूर्वी कश्मीर संबंधात जी चूक केली होती ती आमच्या सरकारने दुरुस्त केली म्हणून ह्या 15 ऑगस्ट ला पहिल्यांदाच अखंड भारताने स्वतंत्रता दिवस साजरा केला आणि निश्चितच ही बाब आनंददायी आहे. बलशाली आणि समृद्ध भारतासाठी आम्हाला तुमची साथ हवीय अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी जनतेला साद घातली, ह्या वेळी मंचावर पालकमंत्री गिरिष महाजन,माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील,आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे,आमदार स्मिता वाघ,जि प अध्यक्षा उज्वला पाटील,आमदार हरिभाऊ जावळे, चंदुभाई पटेल,अशोक कांडेलकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, ललित कोल्हे,जितेंद्र मराठे,दीपक सूर्यवंशी, महेश जोशी,दीपक साखरे,नदंकिशोर महाजन,व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment