जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राची स्थापना करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या केंद्रामुळे खान्देशातील या थोर कवयित्रीचे साहित्य व्यापक पातळीवर प्रसारित होण्यास मोठी मदत होणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या साहित्याच्या अभ्यासाबरोबरच ते जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठी विविध विद्यापीठांशी करार करून भरीव प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात बहिणाबाईंच्या जीवनाविषयी तसेच त्यांच्या साहित्याविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे. लेवाबोली समाजसंस्कृती आणि समाजजीवन यांच्या समग्र अभ्यासासही या केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
खान्देशातील साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासासोबत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी 1 कोटी 63 लाखाच्या अनावर्ती आणि 27 लाख 22 हजारांच्या आवर्ती खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment