Search This Blog

Friday, December 1, 2017

शहरातुन मार्गक्रमण करणारा सहा पदरी समांतर रस्त्यांसह रुंदीकरणव्दारे विकसित करणेस्तव मा.महापौर यांचे म.जिल्हाधिकारी यांना निवेदन”



    जळगांव शहरातील महामार्गावर अपघातांची श्रृखला अव्याहतपणे सुरु आहे. या अपघातात वाहनचालकांची चुक असेल पण या सोबतच या रस्त्यांची रुंदी न वाढविणे ही सुध्दा या अपघातांना जबाबदार असलेली प्रमुख गोष्ट आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासुन आम्ही अनेक पातळ्यांवर आंदोलने केली याचा परिणाम म्हणून शासनाचे लक्ष आम्ही या जिवघेण्या प्रश्नांकडे वेधुन घेतले. यामुळेच जळगांव शहरातील महामार्ग व समांतर रस्त्याचा डि.पी.आर. मंजुरीसाठी गेला. या प्रकरणी याचा त्वरीत पाठपुरावा करुन सदर काम तातडीने हाती घेणे गरजेचे असुन शहरातील नागरीकांच्या जिविताला या महामार्गामुळे मोठा धोका आहे. या धोक्याला शहरातील किमान एक लाख लोक सामोरे जात आहेत, यावरुन या प्रश्नाचा गांर्भीय लक्षात घेवुन शहरातुन मार्गक्रमण करणारा सहा पदरी समांतर रस्त्यासह रुंदीकरणाव्दारे विकसित करणेचे कार्य सत्वर हाती घेणे बाबत मा.महापौर श्री.ललित कोल्हे यांनी म.जिल्हाधिकारी, जळगांव यांना विनंती केलेली आहे. चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्या बरोबर जळगांव शहरातील महामार्ग त्याच लेनिंग व समांतर रस्ते हे प्राधान्य क्रमाने करावे असा हरित लवादाचा निर्णय आहे. मा.कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन आपण सदर महामार्गाचे काम त्वरीत सुरु करण्यासाठी कार्यवाही करावी अशी विनंती मी जळगांव शहराचा महापौर या नात्याने मा.श्री.ललित कोल्हे यांनी म.जिल्हाधिकारी यांचेसह मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. गिरीषभाऊ महाजन जलसंपदा मंत्री तसेच जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे. 

Sunday, November 26, 2017

ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

संगीत कला, नाट्य, साहित्याचा वारसा जोपासण्याचे काम सरकार करीत आहे  -सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे

मुंबई दि.२६ नोव्हेंबर  - राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात सन्मानाचा दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा गतवर्षीचे पुरस्कार प्राप्त विजेते व ज्येष्ठ संगीतकार श्री उत्तम सिंग यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना यशवंत नाटय मंदिर येथे आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आमदार हेमंत टकले, श्रीधर फडके, एम चंद्रा, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र,सन्मानचिन्ह असे आहे. याप्रसंगी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे म्हणाले की, संगीत, नाट्य, साहित्य आणि कलेचा वारसा जोपासण्याचे काम राज्य शासनातर्फे सुरु आहे. संगीत, कला, नृत्य, चित्रकला या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा आणि त्यांना या विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्या विद्यार्थ्यांना १० वी च्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच लोककला, बालनाट्य, शाहिरी, किर्तन हे कलेचे प्रकार राज्यामध्ये पोहोचावेत, त्यादृष्टीने या कलांच्या प्रकारासह या वर्षीपासून सुगम संगीत आणि शास्त्रीय नृत्य यांचा आंतर्भाव या प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आला आहे. राज्यामध्ये ७ दिवसांची ३ प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. जेणेकरुन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले. पुष्‍पा पागधरे यांना जेंव्हा लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड झाल्याचे फोन करुन सांगितले तेंव्हा पुष्पाताई भारावून गेल्या. आयुष्यातील आपले स्वप्न साकार झाल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले. एक पार्श्वगायिका म्हणून माझा जो सन्मान करण्यात आला, त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले, असे मनोगत पागधरे यांनी व्यक्त केले. शुभंकरोती कल्याणम.....ही प्रार्थना तिन्ही सांजेला विद्यार्थी नेहमीच म्हणतात. त्याचबरोबर ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ हे पुष्पाताईंनी गायलेले गीत तितक्याच आवडीने शालेय विद्यार्थी म्हणतात, असेही गौरव उद्गार श्री. तावडे यांनी काढले. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हदयनाथ मंगेशकर, ज्योत्सना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे. पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला, संगीताचे धडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु श्री .आर.डी.बेन्द्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि राग रागीनी यांचे शिक्षण घेतले त्यानंतर मुंबईत्‍ येऊन गीत, गझल, भजन आणि ठूमरी हे सुगम संगीत घेण्यास सुरवात केली. पुष्पाताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रसिदध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, प्रभाकर पंडित, डी.एस.रुबेन, विठठल शिंदे, राम-लक्ष्मण, विश्वनाथ मोरे, यशवंत देव इत्यादी अनेक प्रसिदध संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये त्यांना गायनाची संधी मिळाली.पुष्पाताईंना दोन वेळा शासनाच्या पुरस्कार सोहळयात पार्श्वगायिकेची पारितोषिके मिळाली आहेत. पुष्पाताईंनी खुन का बदला, बिना माँ के बच्चे, मुकददर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठी, भोजपुरी, ओडिया, बंगाली,मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

Friday, November 24, 2017

जेनेरिक औषधांची नावे लिहिणे बंधनकारक

मुंबई, दि. २४ : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नावे वाचण्यास योग्य व प्राथम्याने कॅपिटल लेटरमध्ये नमूद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी कळविले आहे.

जातप्रमाणपत्राबाबत शासनाचा महत्वाचा निर्णय ! आ. खडसे यांच्या प्रयत्नांना यश

आ. एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यामुळेच शासनाचा महत्त्वाचा  निर्णय  
 आता या पुढे जातीचा दाखला काढण्यासाठी घरातील रक्त संबंधातील कोणाचेही एकाचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर पुराव्यांची आवश्यकता राहणार नाही. या संबंधी २४नोव्हेंबर२०१७ रोजी शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेत परिपत्रक  प्रसिद्ध  केले आहे आ. एकनाथराव खडसे यांनी याबाबत वेळोवेळी विधानसभेत सरकारविरोधी आक्रमक होत जातप्रमाणपत्रासाठी रक्ताच्या नात्त्यातीला एकाचे जरी जातप्रमाणपत्र असेल तर दुसरे कोणतेही प्रमाणपत्र घेवु नये, असे विधान केले होते अखेर सरकारने विधेयक करुन तसा निर्णय २४नोव्हेंबर२०१७ रोजी प्रसिध्द केला आहे.

Tuesday, November 21, 2017

वीज वितरण प्रणाली आधुनिक व सक्षम करणार महावितरणच्या पायाभूत आराखडा-2 योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ

वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-2 योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील ग्राहकांना योग्य प्रमाणात खात्रीशीर वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या वीजेच्या मागणीमुळे महावितरण कंपनीच्या वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करणे आवश्यक ठरले होते.
तसेच स्वयंप्रेरित वितरण नेटवर्कचे नियोजनही अत्यावश्यक होते. त्यानुसार या प्रणालीचे बळकटीकरण व विस्तार करतानाच तिची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महावितरण कंपनीने पाच वर्षांच्या कालावधीकरिता पायाभूत आराखडा प्रकल्प-1 (इन्फ्रा-1) तयार केला होता. त्यानंतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार त्यांना नवीन विद्युत जोडण्या देण्यासाठी 2013 ते 2017 या कालावधीत पायाभूत आराखडा प्रकल्प-2 (इन्फ्रा-2) ही योजना राबाविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
या योजनेंतर्गत महावितरण कंपनीस उर्वरित समभागासाठी 2017-18 मधील 560 कोटी 80 लाख रुपयांची अर्थसंकल्पित तरतूद वितरित करण्यासह 2018-19 वर्षासाठी ऊर्जा विभागास उपलब्ध होणाऱ्या नियतव्ययातून प्रकल्पाचा उर्वरित खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आली. या योजनेचा एकूण खर्च 8304 कोटी 32 लाख इतका असून महावितरण कंपनी त्यातील 80 टक्के भांडवल (6643 कोटी 46 लाख) वित्तीय संस्थांमार्फत आणि 20 टक्के भांडवल (1660 कोटी 86 लाख) शासनाकडून समभाग स्वरुपात उभारण्यात येत आहे. शासनाच्या एकूण भागभांडवलापैकी 734 कोटी 51 लाख रुपयांचे भागभांडवल वितरित करण्यात आले आहे.
     या योजनेंतर्गत सद्यस्थितीतील वीज प्रणाली सक्षम करणे, भविष्यात येणाऱ्या भार मागणीची उपलब्धता करणे, सुयोग्य दाबाचा व खात्रीशीर वीज पुरवठा करणे, वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण कमी करणे आणि तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे आदी कामे करण्यात येत आहेत. या योजनेच्या गुणवत्ता तपासणीसाठी महावितरणने तीन श्रेणी गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा अंगिकारली आहे.
-----0-----

शैक्षणिक वर्ष 2017-18 पहिल्या सत्रासाठी निर्णय शिक्षण, परीक्षा शुल्कासह निर्वाहभत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार

शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी देण्यात येणाऱ्या 50 टक्के रकमेच्या 60 टक्के रक्कम आणि निर्वाहभत्त्याची सर्व रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. काही महाविद्यालये व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसंदर्भातील देयके सामाजिक न्याय व इतर विभागांकडे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर 2017-18 पासून राज्य शासनाने सुरू केलेले महाडिबीटी पोर्टल परिपूर्णरित्या कार्यान्वित करणे सुरू आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण व परीक्षा शुल्क इत्यादींची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब लागू शकतो. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यादृष्टीने उपाययोजना करणारे विविध निर्णय घेण्यात आले.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये सामाजिक न्याय, शालेय शिक्षण, आदिवासी विकास व अल्पसंख्याक विकास विभागाच्या काही योजना महाडिबीटी प्रणालीतून वगळण्यासह त्याची अंमलबजावणी ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली. महाडिबीटी प्रणालीवरील सर्व तक्रारींचे निराकरण करुन ती पूर्ण क्षमतेने आणि निर्दोषपणे कार्यान्वित करण्याची कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागास आज देण्यात आले. केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती किंवा फ्री-शिप योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2010-11 ते 2016-17 पर्यंत विविध विभागांकडील प्रलंबित असणाऱ्या शैक्षणिक संस्था-महाविद्यालयांना द्यावयाच्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम तदर्थ तत्त्वावर संबंधित संस्था-महाविद्यालयांना ऑफलाईन पद्धतीने देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संबंधितांना अंतिम देयकाची रक्कम देताना तदर्थ अनुदानाचे समायोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.शैक्षणिक संस्था-महाविद्यालयांना मार्च-2017 अखेर प्रलंबित असणाऱ्या गेल्या सात वर्षांतील शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काच्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम संबंधित शैक्षणिक संस्था- महाविद्यालयांना देण्यात येणार आहे. या निर्णयातून विशेष चौकशी पथकाने कारवाईची शिफारस केलेल्या दोषी संस्था व मान्यता नसलेले अभ्यासक्रम वगळण्यात येणार आहेत. तसेच या सात वर्षांच्या कालावधीतील विद्यार्थ्यांना द्यावयाच्या निर्वाहभत्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थी व महाविद्यांकडून विहित बंधपत्र (इन्डेम्निटी बॉन्ड) घेण्यात येतील.मार्च-2017 अखेर प्रलंबित असणारी रक्कम देण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या योजनानिहाय मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 100 टक्के इतकी तरतूद वित्त विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मार्च-2017 अखेरपर्यंतचे महाईस्कॉल प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी आदिवासी विकास विभागाने कार्यान्वित केलेल्या प्रणालीच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाची महाईस्कॉल प्रणाली कार्यान्वित करुन प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येतील. त्यासाठी अल्प निविदा सूचना प्रसिद्ध करून त्यामाध्यमातून ही प्रणाली सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येईल. *****

फिरता कत्तलखाना; गाडीतच तो डॉक्टर महिलांची सोनोग्राफी करायचा

राज्यात गर्भलिंगनिदान चाचणीस प्रतिबंध असताना आणि याविरोधात शासनाकडुन कठोर कायदे असताना नाशिकमध्ये मात्र धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
नाशिकच्या डॉ. तुषार पाटील यानं थेट आपल्या इनोव्हा कारमधेच सोनोग्राफी सेंटर उघडुन गर्भलिंगचाचणीचं दुकान उघडलं होतं. महापालिकेनं डॉ. तुषार पाटील याचं सोनोग्राफी सेंटर सिल केलं असुन पुढील तपास सुरु आहे. डॉ. तुषार पाटील यानं आपल्या इनोव्हा कारमध्येच सोनोग्राफीचं संपुर्ण मशिन फिट करुन त्यामाध्यमातुन गर्भलिंग निदानाचं अनधिकृत दुकान सुरु केलं होतं. या गाडीत एक गादी टाकुन त्याठिकाणी महिलांना झोपवुन त्यांची सोनोग्राफी केली जात होती. महापालिकेच्या पथकानं अनेक दिवस लक्ष ठेवुन ही गाडी ताब्यात घेवुन याप्रकरणाचा भांडाफोड केला आहे. दरम्यान, डॉ. तुषार पाटील याच्याकडे असलेलं सोनोग्राफीचं साहित्य हे त्रंबकेश्वर येथील आरोग्य केंद्राचं असल्याने परवानगीशिवाय हे साहित्य तुषार पाटील याच्याकडे कसं आलं याचा देखिल आता तपास सुरु आहे. गर्भलिंग निदानासाठी प्रतिबंध असताना देखिल 15 हजार रुपयात अनधिकृतपद्धतीनं तुषार पाटील हे काम करत होते. तुषार पाटील यांच नाशिक जिल्ह्यात तिन ठिकाणी सोनोग्राफी सेंटर असल्याचं देखिल तपासात निष्पन्न झालं आहे.यापूर्वी देखिल डॉ. तुषार पाटील याच्याविरोधात अशाप्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. गावोगावी जावुन डॉ तुषार पाटील हा आपल्या गाडीतच महिलांचं गर्भलिंग निदान करत असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. याशिवाय डॉ. पाटील यानं आतापर्यंत अनेक महिलांचं अनधिकृतपणे गर्भलिंगनिदान केल्याचं देखिल स्पष्ट झाल्यानं डॉ. तुषार पाटील याच्यावर लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याच महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

भारतात लवकरच ५जी सेवा एअरटेल देणार जिओ ला टक्कर

भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत. त्यातच आता हा स्पीड आणखीन वाढवत भारतात नवीन ५जी सेवेसाठी एरिक्सनने पूढाकार घेतला आहे.
५जी सेवेसाठी स्वीडनची टेलिकॉम कंपनी एरिक्सन (Ericssson) ने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे. एरिक्सनचे उपाध्यक्ष आणि दक्षिण पूर्व आशियाचे मार्केट हेड यांनी सांगितले की, "आम्ही जगभरातील ३६ टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत एक करार केला आहे. भारतात ५जी सेवेसाठी भारती एअरटेलसोबत भागीदारी झाली आहे".

Monday, November 20, 2017

आपले अभिलेख चे काम 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय परिषदेत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा गौरव

तालुका स्थरावरील महसूली अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम 100 टक्के पूर्ण करुन जनतेला ‘आपले अभिलेख’ प्रकल्पाद्वारे ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना या परिषदेत प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर सांगली, नंदूरबार, ठाणे, मुंबई उपनगर, गडचिरोली या जिल्ह्यांनीही हे काम 100 टक्के काम पूर्ण केले आहे. तर रिईडीट मॉड्यूल चे काम 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल वाशिम जिल्हा प्रथम, अकोला जिल्हा द्वितीय तर उस्मानाबाद जिल्हा तृतीय क्रमांकावर असल्याने त्यांचाही या परिषदेत गौरव करण्यात आला. परिषदेस राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरीक्त जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

भूसंपादन प्रक्रीया गतीमान होण्यासाठी,महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. 20 : राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत सुसूत्रीकरण व्हावे. ही प्रक्रिया गतीने व्हावी, त्यासाठी महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. महसूल आणि वन विभागाच्यावतीने आज भूसंपादन, पुनर्वसन आणि महसूलविषयक बाबींसंदर्भात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात विविध विकास प्रकल्प सुरु आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया गतिमानव सुटसुटीत होणे आवश्यक आहे. जेणे करुन शासनाचे महत्वाचे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होतील व प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होणार नाही. तसेच विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या नागरिकांनाही त्याचा मोबदला वेळेत मिळायला हवा. त्यांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि विलंब होता कामा नये याची दक्षता आपण घ्यायला हवी. भूसंपादन आणि पुनर्वसन विषयक प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी कायदे आणि नियमात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी शासन सकारात्मक असेल. भूसंपादन प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत अशाप्रकारे पहिलीच परिषद होत आहे यातून ही प्रक्रिया गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2018 पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेत सर्व अधिसुचित पिकांकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत 1 जानेवारी 2018 अशी आहे.
शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेमार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्व अधिसुचित पिकांकरिता 1 जानेवारी 2018 पुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत. योजनेत सहभाग घेण्यासाठी नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी केले आहे.

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर रोजी जळगावातून -डॉ. तात्याराव लहाने

• 15 ऑगस्ट 2019 पर्यंत मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा संकल्प • संकल्पाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी • येत्या 18 महिन्यात राज्यातील 17 लाख रुग्णांवर करणार शस्त्रक्रिया जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन.
• डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत स्वत: करणार शस्त्रक्रिया . दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांवर प्राथम्याने होणार उपचार 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात होणार तपासणी जळगाव, दि. 20 - येत्या 18 महिन्यात (15 ऑगस्ट 2019 पर्यंत) मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केला आहे. या संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नियोजन केले असून पुढील 18 महिन्यात राज्यातील 17 लाख मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथून करण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांनी घ्यावा. असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आज केले. या मोहिमेच्या शुभारंभनिमित्त करावयाच्या तयारीची आढावा बैठक डॉ. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, रामेश्वर नाईक, पितांबर भावसार, अरविंद देशमुख यांचेसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. लहाने म्हणाले की, राज्यात मोतीबिंदूचे सुमारे 17 लाख रुग्ण आहे. या रुग्णांना दृष्टि देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. हे काम येत्या 18 महिन्यात पूर्ण करावयाचे असून यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून येत्या 23 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. यासाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर या तालुक्यातील प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांची पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू असेल त्यांना 23 तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 हजार रुग्णांची तपासणी एकाच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयातील 5 वॉर्डात तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख स्वत: करणार आहे. ज्या रुग्णांच्या डोळयात मोतीबिंदू आढळेल त्यांचेवर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करतांना दोन्ही डोळयांनी अंध, एका डोळयाने अंध व मोतीबिंदू फुटल्यामुळे काचबिंदू झालेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 1200 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. या नियोजनानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, नर्सींग स्टाप उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली. मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र या अभियानाचा शुभारंभ जळगाव जिल्हयातून होत आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान यशश्वी पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी या बैठकीत दिले. यावेळी रामेश्वर नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Sunday, November 19, 2017

मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र लवकरच कणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



महाराष्ट्र राज्यात जवळपास १७ लाख मोतीबिंदू आजाराचे रुग्ण असुन या आजारामुळे डोळ्यांना अंधत्व येते. वयाच्या ४५ वर्षानंतर मोतिबिंदूचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणिय आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा मोतिबिंदूमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याच्या नियोजनाची जबाबदारी वैद्यकीय  शिक्षणमंत्री तथा राज्यभरात आरोग्य महा शिबिरे घेणारे ना. गिरीषभाऊ महाजन यांच्यावर सोपविली आहे.

ना. गिरीषभाऊंनी नेत्रविशारद डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिनी पारेख यांच्या नेतृत्वात काम सुरु केले आहे. या दोघांच्या मार्गदर्शनात राज्यभरात ठिकठिकाणी नेत्र शस्त्रक्रिया होत आहेत. मोतिबिंदू मुक्त अभियानाचा पहिला टप्पा जळगाव येथून सुरु होत आहे. या अभियानांतर्गंत जळगाव येथे २,००० रुग्णांचे अॉपरेशन केले जाणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,{जळगाव जिल्हा रुग्णालयात} दि. २३ नोव्हेंबरला मोतिबिंदू शस्त्रक्रिया करिता तपासनि शिबिर होणार आहे. या साठी सर्व मोतिबिंदू रुग्णांची तपासनि दि.23 रोजी व शस्रक्रिया दि. २४ व २५ नोव्हेंबरला दि. २६ नोव्हेंबरला रुग्नाची पुन्हा भर्ति होतील. दि. २७ व २८ ला शस्रक्रिया दि. २९ ला रुग्नाची भर्ति व दि.30 व 1 डिसेबर शस्त्रक्रिया होतील.दि.2 डिसेबर सुट्टी या अभियानात अॉपरेशन झालेल्या सर्व रुग्णांची पुन्हा तपासणी दि. ८ डिसेंबरला होईल.
सर्व शस्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे होनार आहे

आधार संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतन रोखीने मिळणार



मुंबई, दि. १९ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी सध्या ते पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पण बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जून २०१७ पासूनचे मानधन रखडले असून ते सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 तथापी, मोहीम राबवून डिसेंबर २०१७ पर्यंत उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०१८ पासून त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे, असे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) आयुक्तालयास दिले आहेत. 
१ लाख ८५ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात
राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या २ लाख ७ हजार इतकी आहे. पुर्वी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने दिले जात असे. त्यासाठीचा निधी हा मंत्रालय, आयसीडीएस आयुक्तालय, जिल्हा कार्यालय, तालुका कार्यालय अशा विविध टप्प्यातून अंगणवाडी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत असे. या सर्व प्रक्रियेस फार विलंब लागत असे. हा विलंब टाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धती अवलंबिण्यात आली. या पद्धतीत मधील सर्व टप्पे रद्द होऊन आयसीडीएस आयुक्तालयातून थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा होऊ लागले. त्यामुळे मानधनासाठी लागणारा विलंब टळला आहे.

यासंदर्भात माहिती देताना आयसीडीएस आयुक्त कमलाकर फंड म्हणाले की, पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आतापर्यंत १ लाख ८५ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश झाला असून सध्या त्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा होत आहे. उर्वरीत साधारण २२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे त्यांचे जून २०१७ पासुनचे मानधन अदा करता आलेले नाही. सध्या या कर्मचाऱ्यांना जून ते डिसेंबर २०१७ पर्यंतचे मानधन जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून त्यांना प्रलंबित मानधन तातडीने रोखीने अदा केले जाणार आहे, असे श्री. फंड यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आधार संलग्नतेसाठी मोहीम राबवा – मंत्री पकजा मुंडे

मंत्री पंकजा मुंडे यासंदर्भात म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळणे आवश्यक आहे. यासाठीच महिला बालविकास विभागाने पुढाकार घेऊन अत्याधुनिक अशी पीएफएमएस प्रणाली विकसीत केली आहे. पण काही तांत्रिक कारणास्तव साधारण २२ हजार अंगणवाडी कर्मचारी अद्याप या पद्धतीत येऊ शकलेले नाहीत. या कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करुन त्यांना पीएफएमएस प्रणालीत आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०१७ अखेर या कर्मचाऱ्यांना पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आणून जानेवारी २०१८ पासून त्यांचे मानधनही थेट बँक खात्यात जमा करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी आयसीडीएस आयुक्तालयास दिले आहेत.

Friday, November 17, 2017

ओबीसींसह विजा, भज व विशेष मागास प्रवर्ग क्रिमीलेअरमधून वगळण्यासंदर्भात एकत्रित प्रस्ताव सादर करावा - मुख्यमंत्री



मुंबई, दि. 17: इतर मागासवर्गीयांसह (ओबीसी) विमुक्त जाती (विजा), भटक्या जमाती (भज) प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील सर्व जाती उन्नत स्तरातून (क्रिमीलेअर) वगळण्यासंदर्भात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली आहे.
इंदिरा साहनीविरूद्ध भारत सरकार या 1992 मधील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार इतर मागास प्रवर्गांना क्रिमीलेअरचे तत्त्व लागू करण्यात आले होते. राज्यात ते 1994 मध्ये लागू करण्यात आले. मात्र, विजा (अ) आणि भज (ब) हे संवर्ग 1994 ते 2004 या कालावधीत क्रिमीलेअर तत्त्वाच्या कक्षेबाहेर होते. त्यानंतर 2004 मध्ये हे तत्व या संवर्गांसाठीही लागू करण्यात आले.
दरम्यान, 2013 मध्ये राज्य सरकारने विजा (अ), भज (ब, क, ड) तसेच विशेष मागास प्रवर्ग यांना क्रिमीलेअर तत्त्वातून वगळता येईल काय, याबाबत शिफारस करण्यास राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती केली होती. आयोगाने या अहवालावर हरकती आणि सूचना मागविण्यासाठी ऑक्टोबर 2014 मध्ये राज्य सरकारकडे विनंती केली होती. तथापि इतरही अनेक जातींकडून अशाच प्रकारची मागणी सातत्याने होत असल्याने सर्वंकष अभ्यास करून राज्य मागासवर्ग आयोगाने एकत्रित प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती आता राज्य सरकारने केली आहे.

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ गावपातळीवर पोहोचण्यास मदत - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



  जळगाव, दि. 17 - जिल्ह्याचा सांस्कृतिक विकास होण्यासाठी वाचन चळवळ वाढीस लागणे आवश्यक असते. यासाठी शासनाने दरवर्षी जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या ग्रंथोत्सावाच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ गावपातळीवर पोहोचण्यास मदत होणार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
 राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्ममाने सरस्वती हॉल (लेवा बोर्डिंग) येथे जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते फीत कापून  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तर प्रमूख अतिथी म्हणून महापौर ललीत कोल्हे हे होते. यावेळी व्यासपीठावर सहायक ग्रंथालय संचालक, नाशिक आशिष ढोक, समितीचे सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा प्रकाशक संघटनेचे प्रतिनिधी युवराज माळी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल अत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव प्रशांत पाटील हे उपस्थित होते.
  यावेळी मान्यवरांनी ग्रंथप्रदर्शन दालनास भेट देऊन पाहणी केली. या ग्रंथदालनात महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकासह विविध मान्यवर प्रकाशकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हणून मान्यवरांचे स्वागत केले.
  यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, ग्रंथ हे गुरु असल्याने ग्रंथालयातून ज्ञानार्जनाचे कार्य होत असते. वाचकांमध्ये वाचनाची व साहित्याची गोडी निर्माण करण्याचे काम ग्रंथालये करीत असतात. हे कार्य गावपातळीपर्यंत जाण्यासाठी गावागावात ग्रंथालय सुरु झाले पाहिजे. यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने स्वत:हून पुढे येऊन नागरीकांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन ग्रामीण भागातही ज्ञानाधिष्ठित पिढी तयार होण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
 
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ग्रंथोत्सवाचे उद्घाटक आमदार सुरेश भोळे म्हणाले की, शासन नागरीकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहे. या योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न केले पाहिजे. ग्रंथालयामध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांचा लाभ त्या त्या क्षेत्रातील नागरीकांना होण्यासाठी ग्रंथालय विभागाने नागरीकांमध्ये जनजागृती करावी. लहान मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना आवडणारी पुस्तके ग्रंथालयात असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरीकांसाठी ग्रंथालयात वाचनाची व्यवस्था केल्यास त्यांनाही नवनवीन पुस्तके वाचावयास मिळतील. ग्रंथालय चळवळीच्या वाढीसाठी ग्रंथालय कार्यालयास आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही आमदार भोळे यांनी यावेळी दिले. यावेळी महापौर ललीत कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतूक करुन शुभेच्छा दिल्या.
  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले की, ग्रंथालयाच्या इमारतीसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिली असून इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रक्कम उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी 9 वाजता बहिणाबाई उद्यान येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीचे पूजन आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथदिंडीत शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमूख मार्गावरुन वाजत गाजत ही दिंडी सरस्वती हॉलच्या ग्रंथोत्सवस्थळी पोहोचली तेथे या दिंडीचे विधिवत स्वागत करण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार रतन थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, विविध शाळांचे विद्यार्थी, ग्रंथप्रेमी नागरीक उपस्थित होते.
  दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्य संमेलन, विविध विषयांवरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मान्यवर कवी, साहित्यिक सहभागी होणार असल्याने जळगावकरांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

एटीएम कार्डद्वारे चोरीचे पैसे बँकांनी द्यावेत! ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा

स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे.



पुणे : स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. अशा प्रकरणात बँकांनी ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे पत्र सायबर गुन्हे शाखेने शहरातील बँकांना पाठविले आहे. बँकांनीदेखील त्याला तत्त्वत: मान्यता दिली असल्याने, ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. बनावट एटीएम कार्ड तयार करून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणा-या टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता. गेल्या महिन्यात पोलिसांनी या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून विविध बँकांचे कोरे एटीएम कार्ड, एटीएम कार्ड वाचणारे स्कीमर, पिन होल कॅमेरा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने शहरातील दहा विविध एटीएम केंद्रांत असे स्कीमर लावल्याची माहिती समोर आली होती. सायबर गुन्हे शाखेच्या निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, की बनावट एटीएम कार्डद्वारे फसवणूक झाल्याप्रकरणी ४४ जणांनी अर्ज केला आहे. त्यांची जवळपास १५ लाख रुपयांची रक्कम बनावट कार्डद्वारे लांबविण्यात आली आहे. यात ग्राहकांचा कोणताही दोष नाही. एटीएम केंद्रावर पुरेशी सुरक्षा न ठेवल्याने ग्राहकांची गोपनीय माहिती चोरट्यांना मिळविता आली. अर्जदारांशी निगडित बँकांना पैसे परत देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

Thursday, November 16, 2017

बातमीची विश्वासार्हता जपणे हेच माध्यमांसमोरील प्रमूख आव्हान राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रातील मान्यवरांचा सूर


       जळगाव, दि. 16 - माध्यम ही समाजाची आरसा असल्याने सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून, नैतिकमुल्यांची जोपासना करुन बातमीची विश्वासार्हता जपणे हेच माध्यमांसमोरील महत्वाचे आव्हान असल्याचे विचार आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
  राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात भाग घेताना मान्यवरांनी वरील विचार मांडले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे हे उपस्थित होते.
  वृत्तपत्रांसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्रात लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, दिव्य मराठीचे निवासी संपादक त्र्यंबक कापडे, सकाळचे संपादक विजय बुवा, दैनिक जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेखर पाटील, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, मी मराठी चे प्रतिनिधी संतोष सोनवणे आदिंनी सहभाग घेतला.
  यावेळी वृत्तपत्रांसमोरील (प्रिंट मिडीया) आव्हाने यावर बोलतांना मिलींद कुलकर्णी म्हणाले की, वर्तमानपत्रे हे समाजमनाचा आरसा असल्याने बातमीत वास्तवतेला महत्व देणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ बातम्याच समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
  त्र्यंबक कापडे म्हणाले की, आजकाल बहुतेक वाचक हे सोशल मिडीयावर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवतात. परंतु लोकशाहीत बातम्यांच्या विश्वासार्हतेवर पुढील काळ अवलंबून असल्याने विश्वासार्हतेबरोबरच नैतिकमूल्य जोपासणे हे माध्यमासमोरील मोठे आव्हान आहे.
विजय बुवा म्हणाले की, वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाही समृध्द करण्यामागे वृत्तपत्रांचा मोठा वाटा आहे. लोकांचा विश्वास हा माध्यमांवर असल्याने आपली सद्सदविवेकबृध्दी जागृत ठेवणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आजकाल सर्वांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आपले विचार मांडता येतात. परंतु सोशल मिडीया हाताळण्याचे तंत्रज्ञानही अवगत करणे आवश्यक आहे.
  सोशल मिडीयावरील आव्हाने यावर बोलताना शेखर पाटील म्हणाले की, सोशल मिडीयावर पत्रकारीता करणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करुन घ्यावी. ते हाताळण्याचे तंत्रज्ञान अवगत करावे. त्याचे फायदे तोटे समजून घेऊनच त्याचा वापर करावा. कारण सोशल मिडीयावर टाकलेली पोस्ट सेंकदात जगभर पोहचते. त्यामुळे आपली सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून पोस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
  सोशल मिडीयावर पोस्ट टाकताना आपली भाषा शुध्द असली पाहिजे त्याचबरोबर पोस्ट ही कमी शब्दात मांडता आली पाहिजे. तसेच येणाऱ्या पोस्टची शहानिशा करुनच व तीची सत्यता पडताळूनच पुढे पाठविण्याची काळजी घेण्याचे आवाहन दिलीप तिवारी यांनी केले.
  इलेक्ट्रॉनिक्स माध्यमासमोरील आव्हानांवर बोलतांना संतोष सोनवणे म्हणाले की, या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आधुनिकतेची कास धरणे आवश्यक आहे तरच आपण टिकून राहू शकतो. अन्यथा आपण प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भिती असल्याने स्वत:ला सतत अपडेट ठेवावे.
  चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपाप्रंसगी प्राचार्य डॉ राणे म्हणाले की, माध्यमे ही समाजप्रबोधनाबरोबरच समाज जागृतीचेही काम करीत असल्याने माध्यमांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोण बदलता कामा नये यासाठी सर्वांनी सामाजिक भावना जागृत ठेवून संवेदनशीलतेने काम करावे.
  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली.
  चर्चासत्राची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या चर्चासत्रास प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, मास मिडीया व वृत्तपत्र शाखेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार बेंडाळे महाविद्यालयाच्या मास मिडीया विभागाचे प्रमुख प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नाना उत्तरे देऊन त्यांचेशी संवाद साधला.                         

Wednesday, November 15, 2017

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर आता ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’




 ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या (एनएसडी) धर्तीवर चित्रनगरीमध्ये ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. याबाबत पहिले पाऊल टाकत मुंबईत महाराष्ट्र ड्रामा स्कूल कसे असेल याबाबत राज्य शासनाने कार्यकारी समितीची स्थापना केली.
महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामामार्फत रंगभूमी विषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळणे शक्य होणार आहे. मुळातच नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे रंगभूमीच्या विकासासाठी काम करीत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही रंगभूमीच्या सर्वांगीण विकासाला वाहिलेले संकुल असावे यादृष्टीने राज्य शासन प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या माध्यमातून नाट्य, कलाप्रेमींना नाट्यकलेचे शिक्षण घेत नाट्यकलेशी जवळीक साधता येणार आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर विदेशातीलही नाट्यप्रेमींना या स्कूलमध्ये शिक्षण घेता येईल अशी या स्कूलची रचना असणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नाट्य कला आघाडीवर आहे. दिल्लीत असलेल्या एनएसडीमध्ये देशभरातील कलाकार शिकण्यासाठी येतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा असते. महाराष्ट्रातील एक किंवा दोन व्यक्तींची निवड तेथील अभ्यासक्रमांसाठी होते. महाराष्ट्रात स्कूल ऑफ ड्रामा सुरू झाले तर मराठी कलाकारांना मोठया प्रमाणात शिकवण्याची संधी मिळेल. शिवाय, एनएसडीच्या अभ्यासक्रमासोबतच मराठी लोककला व लोकनाट्याचा अभ्यास करायला मिळणार आहे.
पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे नाट्यक्षेत्राशी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम
केंद्र शासनाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या स्थापनेचा पूर्वतयारीचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रथमत: नाट्यक्षेत्राशी निगडीत असे चार वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) सुरु करण्यात येत आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे सुरु करण्यात येतील.
कार्यकारी समितीची स्थापना
याशिवाय महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा कसे असेल यासाठी एका अभ्यासगटाचीही स्थापना करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य असतील. याबरोरबरच मुंबई विदयापीठाचे अमोल देशमुख, अभिराम भडकमकर आणि दिपक करंजीकर हे अशासकीय सदस्य असतील. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे या कार्यकारी समितीमध्ये सदस्य सचिव असतील. सदर समिती येत्या सहा महिन्यात प्रस्तावित महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामामध्ये विविध अभ्यासक्रम, शिकविण्यात येणारे विषय, शिकविण्याची कार्यपध्दती याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करणार आहे.

कर्ज न दिल्यास बँकेवर कारवाई करणार - मधुकर जाधव



रिझर्व बँक मुंबई विभाग यांचा तर्फे उद्योजक आणि बँकर्स यांच्या एकत्रितरित्या जिल्हा नियोजन भवनात टाऊन हॉल मीटिंग आयोजित करण्यात आली होती बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देत नाही त्रास देतात उद्धट बोलतात फिरवाफिरव करतात शासन अनुदान असलेल्या उद्योगांना बँक कर्ज देत नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा उद्योजकानी टाऊन हॉल मीटिंग मध्ये वाचला .त्यावेळी कर्ज न देणारया बँकांवर कारवाही करण्याचा इशारा रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नाशिक विभागाचे रिजनल मॅनेजर मधुकर जाधव यांनी दिला आहे . जीडीपी वाढवण्यासाठी सरकार नेहमी बँकांवर ताण  देत असते  बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आहे मात्र स्लो डाऊन झाल्याने बँकांवर ताण वाढला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये ४०% वाट आहे या उद्योगांच्या प्रगती नंतरच अर्थव्यवसतेत सुधारणा होईल .असे प्रतिपादन जाधव यांनी केले .


Tuesday, November 14, 2017

कमी दराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवा- ना. सुधीर मुनगंटीवार

 वस्तू आणि सेवा कर प्रणालीत हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर ५ टक्के इतका कमी करण्यात आला असून याबद्दलची अधिसूचना निर्गमित होताच या कमी कर दराचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावा,  असे आवाहन वित्तमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी केले. आज सह्याद्री अतिथीगृहात हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट  असोसिएशन ( वेस्टर्न इंडिया) च्या प्रतिनिधींनी वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांची भेट घेऊन कर दर कमी केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील कर दर कमी झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. जे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत रजिस्टर नाहीत त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा यासाठी चर्चासत्रे, मेळावे घेण्यात यावेत.  ज्या हॉटेल व्यावसायिकांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा जीएसटी नंबर हॉटेलमध्ये दर्शनी भागावर डिस्प्ले करावा. तशी कायद्यात तरतूद आहे असेही ते म्हणाले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीचे करजाळे वाढवताना जे छोटे व्यावसायिक कर जाळ्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचे  परतावा दाखल करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभाग मदत करील तसेच त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण ही देईल, अशी माहिती वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी दिली.
हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना कमी करदराचा लाभ देताना इनपूट टॅक्स क्रेडिट सिस्टीम पूर्ववत  ठेवावी  या प्रमुख मागणीसह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या इतर बदलांबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा केली.
बैठकीस वस्तू आणि सेवा कर आयुक्त राजीव जलोटा यांच्यासह हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय रिझर्व बँक आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्तपणे आयोजित टाऊनशिप मीटिंग संपन्न....

भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव म्हणाले की, आतापर्यंत रिझर्व बँक जेथपर्यंत पोहोचली नाही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आजचे चर्चासत्र याच कार्यक्रमाचा भाग आहे.
देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही विकासात बँक महत्वाचा घटक असल्याने बँकांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली पाहिजे असे सांगून उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख म्हणाले की, प्लॅस्टीक पार्कसाठी जळगाव जिल्हयातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. तसेच केळी प्रक्रिया उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन जिल्हयात तसे क्लस्टर तयार करावे यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. उद्योग विभागामार्फत उद्योगांची नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे  सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय यांनी त्यांच्या विभागामार्फत्‍ उद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी एस. बी. इंडस्ट्रीज आणि समृध्दी प्लॉस्ट च्या प्रतिनिधींना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली. खान्देशात अशाप्रकारचे चर्चासत्र प्रथमच होत असल्याने या चर्चासत्रास जिल्हयातील उद्योजक तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बुऱ्हाडे यांनी तर आभार श्री. दामले यांनी मानले.

"सामना "मधुन शिवसेने ने केले खडसेंचे समर्थन

शिवसेने ने आपले मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकामधुन  माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडण करत भाजपावर  निशाणा साधला आहे .
भाजपा ने खडसे यांचे  दाऊद सोबत संबंध जोडुन खडसे यांच्या देशभक्तीवर गंभीर आरोप केले आहेत .
एकीकडे सेना भाजपा यांच्यात राज्यात भांडणे सुरु असतांना दुसरीकडे आ.खडसे यांचे समर्थन केल्यामुळे राज्यभरातील राजकारणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत का अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

मुलांनी आयुष्यभर आपल्यातली निरागसता जोपासावी –ना. विनोद तावडे

प्रतिनीधी, मुंबई




मुंबई, दि. 14 : दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
बालदिनाच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मंडळच्यावतीने आयोजित कार्यक्रमात श्री.तावडे बोलत होते. यावेळी बालभवनच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नामवंत बाल साहित्य लेखिका डॉ. विजया वाड, बालभवनचे संचालक राजेंद्र अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बालभवनच्या सभागृहात जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध छायाचित्रांची पाहणी श्री.तावडे यांनी करुन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची माहिती घेतली. छायाचित्र कलेमध्ये सफाईदारपणा आणि सर्जनशीलता येण्यासाठी वेगवेगळी रंगसंगती वापरण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना श्री.तावडे म्हणाले,  बालभवनच्या परिसरात आज या लहान मुलांची चित्रकला बघताना मला लहानपणीचे दिवस आठवले. विद्यार्थ्यांनी  रेखाटलेली  वेगवेगळी छायाचित्रे त्यांच्यातील सूप्त कलागुणांचे दर्शन घडवणारी आहेत. लहानपणी आपल्याला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही, परंतु ज्यावेळी शिक्षकांनी गणिताशी संवाद साधायला शिकवलं त्यावेळी या विषयात मला रुची यायला लागली. तेव्हा तुम्हीसुद्धा अभ्यास करताना विषयाशी एकरूप होऊन पुस्तकांशी संवाद साधायला शिका. अभ्यास हा कंटाळवाणा न होता ती एक आनंददायी प्रक्रिया बनून जाईल. पाठ्यक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्त  अवांतर वाचन वाढवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा सल्ला देखील श्री. तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रमासाठी आजपासून विशेष मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 भारत निवडणूक आयोगाने  1 जानेवारी, 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमातंर्गत 15 नोव्हेबर ते 30 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
  या विशेष मोहिमेत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता 15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (BLOs) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. या कार्यक्रमात पुर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नांव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना क्र.6 चे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. सन 2018 च्या पुनरिक्षणासाठी पात्र नागरिकांना नमुना क्र. 6 चे वाटप करणे व त्यांच्यकडून परत घेणे व जमा करणे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थालांतरित व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना क्र.7 चे वाटप करणे व जमा करणे.  प्रारुप मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना क्र. 8 चे वाटप करणे व जमा करणे. मतदाराचे मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे. अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटूंबाकडून प्राप्त करुण घेणे. दुबार मतदारांना सुचना बजावणी करणे व पंचनामा करणे. कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे, मतदार यादीत मतदारांचे छायाचित्र उपलब्ध नाही अशा मतदारांचे नजिकच्या काळातील छायाचित्र मतदारांकडून प्राप्त करुण घेणे इत्यादी महत्वाची कामे करण्यात येणार आहे.
  सर्व मतदारांनी या विशेष मोहिम अंतर्गत मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.

जळगावने सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातूनदेशाला नवी दिशा देण्याचे काम केले- किशोर राजे निंबाळकर

देशाच्या विकासात लहान उद्योगांचा महत्वपूर्ण वाटा आहे. सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून जळगावचे नाव देशभर गेले असून या उद्योगाने देशाला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
भारतीय रिझर्व बँक मुंबईच्या वित्तीय समावेशन विभागातर्फे खान्देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योजकांसाठी जिल्हा नियोजन भवनात चर्चासत्राचे (टाऊन हॉल मिटिंग) आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव, उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे  सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने लहान उद्योगांना उभारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हयात पूरक उद्योगांना लागणारा कच्चा माल मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. जळगाव, भुसावळ सारखे रेल्वे जंक्शन असून डिसेंबर अखेर विमानसेवाही सुरु होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन उद्योजकांनी आपले उद्योग जिल्हयात सुरु केले पाहिजे असे सांगून उद्योजकांना व कर्जदारांना बँकाकडून मिळणाऱ्या वागणूकीबाबत मात्र त्यांनी खंत व्यक्त केली. ग्राहकांशी संवाद वाढवून बॅकांनी पतपुरवठा वाढविला पाहिजे जेणेकरुन उद्योग उभे राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर या चर्चासत्राच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविल्या जाव्यात असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राचा उद्देश सांगताना भारतीय रिझर्व बँक, मुंबईचे महाव्यवस्थापक एम. सी. जाधव म्हणाले की, आतापर्यंत रिझर्व बँक जेथपर्यंत पोहोचली नाही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आजचे चर्चासत्र याच कार्यक्रमाचा भाग आहे. देशाच्या एकूण निर्यातीत 40 टक्के वाटा हा लहान उद्योगांचा असल्याने रिझर्व बँकेने या क्षेत्राला मदतीचे धोरण आखले असून याबाबत रिझर्व बँकेचे हे महत्वपूर्ण पाऊल आहे. लहान उद्योगातून सध्या 25 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. तर अशा उद्योगांची संख्या 2 लाखापेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गोल्ड क्लस्टरला पायाभूत सुविधा कमी पडत असल्याने येथील उद्योगांनी त्या पूर्ण करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही विकासात बँक महत्वाचा घटक असल्याने बँकांनी नेहमीच मदतीची भूमिका घेतली पाहिजे असे सांगून उद्योग विभागाचे सह संचालक पी. पी. देशमुख म्हणाले की, प्लॅस्टीक पार्कसाठी जळगाव जिल्हयातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. तसेच केळी प्रक्रिया उद्योग करणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन जिल्हयात तसे क्लस्टर तयार करावे यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. उद्योग विभागामार्फत उद्योगांची नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एच के. नाईक, सिडबी औरंगाबाद शाखेचे सह महाव्यवस्थापक व्ही. व्ही. आर. प्रसाद, एमएसएमई चे मुंबई विभगाचे सह संचालक शैलेंद्र सिंग, सीजीअीएमएसई, मुंबईचे  सह व्यवस्थापक अभिषेक कुमार राय यांनी त्यांच्या विभागामार्फत्‍ उद्योजकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी एस. बी. इंडस्ट्रीज आणि समृध्दी प्लॉस्ट च्या प्रतिनिधींना कर्ज मंजूरीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या चर्चासत्रात जिल्ह्यातील उद्योजकांनी आपल्या अडीअडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच त्याचे निराकरणही करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली. खान्देशात अशाप्रकारचे चर्चासत्र प्रथमच होत असल्याने या चर्चासत्रास जिल्हयातील उद्योजक तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व बँकाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय बुऱ्हाडे यांनी तर आभार श्री. दामले यांनी मानले.

Monday, November 13, 2017

ना. गिरीष महाजन यांची जळगाव मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी...



आरोग्याच्या प्रश्नांबाबत महाजन यांची मनपा मध्ये तातडीची बैठक..




जळगाव शहरात दोन महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया आदी साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारात सहा जणांच्या मृत्यूची माध्यमात चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमिवर वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांनी आज सायंकाळी उशीरा मनपात पदाधिकारी, अधिकारी व प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या नाकर्तेपणावर ना. महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छता वाढवून साथ रोग नियंत्रणासाठी तंबी दिली. यावेळी महापौर ललित कोल्हे, आमदार राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर व इतर नगरसेवकांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व नगरसेवकांनी तक्रारी केल्या की, मनपात मनुष्यबळ व यंत्रणा पुरेशी आहे पण अधिकारी वर्ग काम करीत नाही.मच्छर, डिस निर्मूलनासाठी यंत्रे वापरात नाही. वॉर्डातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. आमदार भोळे यांनी थेट अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. सर्व बाजू ऐकून ना. महाजन यांनी सर्वांना झापून काढले. ते म्हणाले, संपूर्ण शहर साथरोगांनी तस्त आहे. प्रत्येक घरात रुग्ण आहे. तरी पण मनपाच्या दप्तरी केवळ ११५ संशयित रुग्णाची पालिकेत नोंद आहे. हेच तर नाकर्तेपणाचे लक्षण आहे. ना. महाजन यांनी धुरळणी यंत्राच्या वापराविषयी विचारल्यार अधिकाऱ्यांनी मान्य केले की, सर्व यंत्रे बंद आहेत. याचे कारण पालिकेने काही वर्षा पासून जंतूनाशकच विकत घेतलेले नाही.
घंटागाड्यांचा विषय आल्यानंतर अनेक वॉर्डात कचरा गोळा करायला घंटागाड्याच येत नाही असे नगरसेवक म्हणाले. याची कारणे अधिकाऱ्यांना विचारली असता, किरकोळ व फालतू कारणे दाखवून  घंटा गाड्या जात नाही, असे सांगण्यात आले. मनपाचे कनिष्ट अधिकारी सहकार्य करीत नाहीत असे नगरसेवक म्हणाले.

आपल्या वॉर्डात घंटागाड्या वेळेवर येतील याकडे लक्ष द्या अशी सूचना ना. महाजन यांनी नगरसेवकांना केली. मनपाच्या स्वच्छता विभागात पुरेसे कर्मचारी व यंत्रणा आहे. त्याचा योग्य पध्दतीने वापर करा, असे ना. महाजन म्हणाले.

स्वच्छतेसाठी मनपाला एक महिना मोफत जेसीबी देवू असे आ. भोळे म्हणाले.शहरात साथीचे रुग्ण जास्त आहेत हे लक्षात घेवून कारवाई करा. स्वच्छता मोहीम राबवा, अशीही सूचना त्यांनी केली. नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र टाकायला लावा. कचरापेटीची सवय लावा असेही ना. महाजन म्हणाले.

धुरळणी करणाऱ्यां सोनवणेंचे कौतुक
जळगाव शहरातगेले दोन महिने माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे स्वखर्चाने धुरळणी करुन मच्छर, डास निर्मूलन करीत असल्या बद्दल त्यांचे कौतुक ना. महाजन यांनी केले. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य  अमर जैन, सुनील महाजन व  स्वखर्चाने धुरळणी करीत असलेल्या नगरसेवकांचा. उल्लेख करण्यात आला.

उध्दव पुन्हा गरजले "मी सरकारवर नाराज"

‘होय, मी सरकारवर नाराज आहे, असे जाहीर सभेत बोलतो. कोपऱ्यात जाऊन कशाला बोलु ,अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कथित गौप्यस्फोटावर केली. पवार हे पंतप्रधानांचे गुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. आमदार जाधवांना सबुरीचा सल्ला देत, ‘चांगले काम करा शिवसेना निश्चित सोबत असेल, असे त्यांनी सांगितले

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या मातुःश्री माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी लिहिलेल्या ‘रायभानजी जाधव ः व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी, ‘शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. अटीच्या कर्जमाफीपेक्षा सपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जीएसटी’चे दर कमी केल्याचे त्यांनी सांगत, सिंचन, नोटाबंदीवर सडकून टीका केली.

आमदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी ना. धों. महानोर यांनी स्व. रायभान जाधव यांच्यासोबत केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे यांचीही भाषणे झाली.

सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबा वाघमारे, विनोद घोसाळकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, आमदार निलम गोऱ्हे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, संजना जाधव, विकास जैन, आण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Sunday, November 12, 2017

नोकरी! नोकरी! नोकरी !

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी बातमी आहे.

सिडको (CIDCO) मध्ये विविध पदांच्या एकूण ५७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या ५७ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

सिडकोतर्फे प्रोग्रामर, फील्ड ऑफिसर (जनरल), फील्ड ऑफिसर (सोशल सर्विस), लिपिक टंकलेखक, कंम्प्युटर ऑपरेटर, लेखा लिपिक अशा एकूण ५७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
एकूण जागा - ५७

प्रोग्रामर: १ जागाफील्ड ऑफिसर (जनरल): ४ जागाफील्ड ऑफिसर (सोशल सर्विस): १ जागालिपिक टंकलेखक: २७ जागाकंम्प्युटर ऑपरेटर: ३ जागालेखा लिपिक: २१ जागा

शैक्षणिक अर्हता:

प्रोग्रामर या पदासाठी कम्प्युटर सायन्सची पदवी, SAP ग्लोबल प्रमाणपत्र आवश्यकफील्ड ऑफिसर (जनरल) या पदासाठी विधी पदवी आवश्यक आहेफील्ड ऑफिसर (सोशल सर्व्हिस) या पदासाठी सोशल वर्कमध्ये एमएची पदवी आवश्यकलिपिक टंकलेखक या पदासाठी १० वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. तसेच MSCITकंम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, कंप्युटर ऍप्लिकेशन्स डिप्लोमा / पदवीतर, लेखा लिपिक या पदासाठी वाणिज्य सह १२वी उत्तीर्ण

वयाची अट: 

१ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय: ५ वर्षांची सूट)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

२७ नोव्हेंबर २०१७  

रायसोनीतील उर्वशी शर्मा यांची विभागीय संघात निवड 


येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील उर्वशी सुनील शर्मा यांची आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धा धनाजी नाना महाविद्यालयात पार पडल्या होत्या. या स्पर्धेत शर्मा यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्यामुळे त्यांची विभागीय संघात निवड करण्यात आली. महाविद्यालयात ही विद्यार्थीनी संगणक शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे.
  पुढील हॉलीबॉल स्पर्धा दि.११ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात संपन्न होणार असल्याचे माहिती पत्र मिळाले आहे. पुढील स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.सोनल पाटील यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मागदर्शन लाभले.

मुलीला लहान कारणावरुन चटके दिल्याप्रकरणी चौकशी करा : आ. डॉ. नीलम गो-हे

      पुणे, ता. ११/११/२०१७   :
पुण्याच्या हडपसर परिसरात एका लहान मुलीने  मसाल्यात पाणी सांडल्याच्या कारणावरून महिलेने तिला अनेक ठिकाणी चटके दिल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी आज  शिवसेना उपनेत्या प्रवक्त्या  आ.डॉ.नीलम गो-हे यांनी पोलिस अधिका-यांकडे केली.   आज सायंकाळी त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीची भेट घेऊन विचारपूस केली.  यावेऴी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार व महिला पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे यांच्याकडून केसबाबत व उपचारांची माहिती घेतली. आ. डॉ.गो-हे यांनी या प्रकरणात बंगलादेशींकडून होणारे काही अनैतिक मानवी व्यापार(ह्यमन ट्रॅफिकिंग)चा काही धागादोरा आहे का या दृष्टीने शहानिशा करण्याबाबत सूचना केली. काही काळापूर्वी अशीच एक सरोगसीची केस या परिसरात घडली होती. या घटनेतील सदर पीडित मुलीस योग्य त्या संस्थेत दाखल करावे,चुकीच्या हाती ताबा मिळू नये,दोषींवर योग्य कलमे लावून कायदेशीर कारवाई व्हावी अशा स्वरुपाची अपेक्षा आ. डॉ. गो-हे यांनी        व्यक्त केली.  या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी तक्रारकर्त्या रजनीश तिवारी यांना मिळाली नसल्याचे निदर्शनाला आणल्यावर ती पोलिसांनी त्वरित दिली.    या प्रसंगी  पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,नगरसेविका प्राची आल्हाट, स्त्री आधार केंद्राचे शेलार गुरुजी, शादाब मुलाणी, मनीषा वाघमारे,संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.

मी आहे लाभार्थी ची राष्ट्रवादी महीला आघाडी ने केली पोलखोल


 विविध वाहिन्यांवर झळकत असलेल्या राज्य शासनाच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई गुलाब पवार (मोहमुख, ता. कळवण) यांना सरकारने २०१५ मध्ये शौचालय, तर २०१७ मध्ये घरकुल मंजूर केले.

एवढेच नाही, तर स्वच्छतादूत असलेल्या या महिलेची ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केलीच पण त्यांना सहा महिन्यांचे मानधन दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा खराच आहे. या सर्व घडामोडींमुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली असून, मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून महिलांची बदनामी करणारी वक्तव्ये थांबवावीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.


सहा महिन्यांपासून मानधन नाही
‘मी लाभार्थी’ या जाहिरातीमधील फुलाबाई पवार या महिला स्वच्छता भारत अभियानाच्या स्वच्छतादूत म्हणून काम करतात. मोहमुख पाड्यावरील १६८ कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्याचे त्या काम करतात. आतापर्यंत तेथे १५० शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत; परंतु स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने त्यांना स्वच्छतादूत म्हणून काम केल्याचे मानधन अजून दिले नसल्याचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना सांगितले. सरकारने स्वच्छतादूत महिलेलाच ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरात केल्याची चलाखी केल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी वक्तव्य करताना कुठलीही माहिती न घेता बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे, हे लक्षात येते. तसेच राज्यकर्त्यांची महिलांविषयीची मानसिकता लक्षात येते, असा आरोप सौ. वाघ यांनी केला. वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देऊ, असेही त्या म्हणाल्या.