Search This Blog
Monday, November 20, 2017
आपले अभिलेख चे काम 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय परिषदेत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा गौरव
तालुका स्थरावरील महसूली अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम 100 टक्के पूर्ण करुन जनतेला ‘आपले अभिलेख’ प्रकल्पाद्वारे ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना या परिषदेत प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर सांगली, नंदूरबार, ठाणे, मुंबई उपनगर, गडचिरोली या जिल्ह्यांनीही हे काम 100 टक्के काम पूर्ण केले आहे. तर रिईडीट मॉड्यूल चे काम 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल वाशिम जिल्हा प्रथम, अकोला जिल्हा द्वितीय तर उस्मानाबाद जिल्हा तृतीय क्रमांकावर असल्याने त्यांचाही या परिषदेत गौरव करण्यात आला.
परिषदेस राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरीक्त जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment