सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार970 लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
डॉ. चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावातील 4 हजार968 कुटुंबांतील 25 हजार 375लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार461 कुटुंबांतील 36 हजार 636लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12हजार 256 कुटुंबांतील 65 हजार547 लोक व 15 हजार 135जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील605 कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2 हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार416 कुटुंबांतील 28 हजार 471लोक व 608 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 7 प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.
No comments:
Post a Comment