Search This Blog

Tuesday, August 13, 2019

हतनुर धरण प्रकल्पासाठी शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज सादर करण्याचे प्शासनाचे आवाहन

प्रतिनिधी जळगाव 
                   
  जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरण हे मोठ्या प्रकल्प क्षेत्रातून शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे. अस आवाहन जळगाव पाटबंधारे तर्फे तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडून करण्यात आले. तरी लवकरात लवकर या  प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यास सांगितलंय. हतनुर येथील तापी नदी, सुकी, अंभोरा, तोंडापुर, मंगरूळ, यांसह इतर गावांचा समावेश आहे. तसेच या लघुप्रकल्पांवरील प्रवाही जलाशय कलव्यांवर उपसा - नदी नाले सिंचनाने पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकाना खरीप हंगामाला होणाऱ्या पाण्याचा साठा उपलब्ध करण्यात येणारये . यासाठी खरीप हंगामी पिके कपाशी, भुईमूग, साळ, ज्वारी, इतर अन्याधान्य या  सारख्या पिकांना अटी व शर्ती लागू असतील. या भागातील शेतकऱ्यांनी शाखाधिकारी शाखा कार्यालयात वेळेत पोष्टाने किंवा प्रत्यक्षात देण्यात यावे. 

No comments:

Post a Comment