Search This Blog

Wednesday, August 21, 2019

"गटारीवर ढापे नव्हे तर तिरड्या"

प्रतिनिधी जळगाव ग्रामीण,

वरसाडे प्र. बो. येथे गावातील मुख्य रस्त्यांवरील गटारीवर ढापे बनवणे अपेक्षित होते. पण ग्रामपंचायतीने त्यावर गतिरोधक बनवले आहेत, त्यामुळे अपघाताचे संभव्य धोके त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत, जर त्या ठिकाणी कुठलाही अपघात झाला तर त्यास कोण जबाबदार राहणार? असाही प्रश्न गावकऱ्यांनी कडून निर्माण होत आहे. ह्या संबंधी आमचे प्रतिनिधी धनराज भोईर  यांनी ग्रामसेवक गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले गटारीचे पाणी जाण्यासाठी ढापे उंच केले आहेत.

पण ह्या ठिकाणी गेल्या वर्षांन-वर्ष गटारीच काढल्या जात नाही अस गावकऱ्यांन कडून कळाले मग अशात गावकऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. हा एकंदरीत गावकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे, "जखम डोक्याला मलम पायाला" अशी स्थिती येथे निर्माण झालेली आहे. गटार स्वच्छ करायची नाही म्हणून ढापे उंच करायचे ही नवीन पद्धत ग्रामपंचायतीने गावात रुजवली आहे. "खरतर ढापे हे रस्त्याला समांतर असतात" जर ढापे ग्रामपंचायतीच्या दृष्टीने गतिरोधक असतील तर ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी तसे सांकेतिक फलक लावणे अपेक्षित आहे.जेणेकरून संभव्य अपघात टळतील.आता जि.प. प्रशासन ह्या कडे कसे लक्ष देते आणि संबधीतावर काय कार्यवाही करते. ह्या कडे जीव मुठीत घेऊन बसलेल्या गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

No comments:

Post a Comment