प्रतिनिधी मुंबई,
- । जळगाव येथील तत्कालीन न.पा.ने हुडको कडून घेतलेल्या 233.91 कोटी रु. कर्जाची एकत्रित रक्कम हुडकोस भरून जळगाव म.न.पा. कर्जमुक्त करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविला असून या साठीची रक्कम राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातील 50 टक्के रक्कम पुढील काळात जळगाव म.न.पा. स दरमहा 3 कोटी या प्रमाणे राज्य शासनास परत करायची आहे. राज्य शासनाने जळगाव म.न.पा. वरील कर्जाचा डोंगर कमी केल्याबद्दल आज सायंकाळी महापौर सीमा भोळे,उपमहापौर अश्विन सोनवणे,स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, व आदी सर्व नगरसेवकानी म.न.पा.समोर फटाक्यांची आतषबाजी करून स्नेह आनंद साजरा केला.
ह्या सबंधी आमच्या प्रतिनिधीनी जळगाव शहराचे
आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतल्या " सर्वात आधी मी जळगाव शहराचा आमदार ह्या नात्याने मुख्यमंत्री महोदयांचे, माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, यांचे आभार व्यक्त करतो, तसेच महापौर,उपमहापौर सर्व नगरसेवक मा. आयुक्त ह्या सर्वांचे अभिनंदन करतो, आजचा हा निर्णय जळगाव शहराचा विकासास पोषक व चालना देणारा असा हा निर्णय आहे." अस मत त्यांनी व्यक्त केल
महापौर सीमा भोळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी " हा निर्णय म्हणजे मा.मुख्यमंत्री महोदय मा. गिरीषभाऊ महाजन यांनी जो शब्द दिला होता तो शब्द आज त्यांनी पूर्ण करून आपल्या शब्दाची शब्दपूर्ती केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते हा निर्णय म्हणजे जळगाव शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा निर्णय आहे." अस मत त्यांनी व्यक्त केल.
No comments:
Post a Comment