Search This Blog

Tuesday, August 13, 2019

चाळीसगावकरांची पुरग्रस्तांसाठी मदत

प्रतिनिधी जळगाव,

जीवनावश्यक वस्तूंच्या भरलेल्या ७ ट्रक रवाना ; राजीव देशमुख यांनी दिली माहीती...
दिनांक १० ते १२ ऑगस्ट या दोन दिवसात चाळीसगाव तालुकावासियांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ७ ट्रक (७५ टन) सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचा जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरुपात मदतीचा हात दिला.आज सदर मालवाहतूक ट्रक सांगली सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने सर्व मदतदार व कार्यकर्ते लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला.

सांगली सातारा आणि कोल्हापूरकडे रवाना करण्यात आलेल्या वाहनांसोबत ३० स्वयंसेवकांचा चमू रवाना झाला असून संकलित करण्यात आलेल्या साधनसामग्रीचे वितरण करण्यात येणार आहे.दुपारी २ वाजता वाहने रवाना करण्यात आलीत.याप्रसंगी उद्योजक प्रविणभाई पटेल,अशोकभाई पटेल,दिनेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी,व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख,नगरसेवक राजेंद्र चौधरी,अशोक खलाणे,सुरेश स्वार,उद्धव महाजन,डॉ.सुनील राजपूत,बाजार समिती खरेदीदार संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सलग दोन दिवस चाललेल्या या मदत केंद्रात लहान विद्यार्थ्यांपासून गृहीणी,नोकरदार,व्यापारी यांच्यासह अनेक राजकीय विविध पक्षाचे,संस्थाचे पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर भरघोस प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर साहित्य सामुग्री दिल्याने चाळीसगाव येथील मदत केंद्रावरुन जळगांव जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी मदत प्रथमच पोहोचवली गेली आहे

यात पाणी (१७ हजार लिटर) दुध पावडर (५ क्विंटल) कांदा (३ टन) बटाटा (२.९४ टन) तांदूळ (११.२५ टन) आटा (५.९० टन) तुरदाळ (२.१८ टन) गहू (२.१७ टन) गोडेतेल (१.७६ टन) ब्लॅंकेटस ( ५ हजार) बाजरी (८ पोते) बिस्किटे (९ हजार पुडे) साखर (३ क्विंटल) मसाला (८ क्विंटल) टूथपेस्ट ब्रश ( ७०० नग) चटई (५०० नग) ड्रायफूटस (१० बॉक्स) नवीन साडी ( ३८ कट्टे) चहापावडर (२८० किलो) सॅनेटरी नॅपकीन (१० बॉक्स) वहाण (२०० नग) झाडू (२०० नग) साबण (१० बॉक्स) गावराणी तूप (७५ किलो) ताट वाट्या ग्लास सेट (१० पोते) औषधी (१५ बॉक्स) मीठ (१५० गोणी) लसूण (३ पोते) फिनाईल (३०० नग) मेणबत्ती (३ बॉक्स) शेवमुरमुरे (६ कट्टे) आदी साहीत्य रवाना करण्यात आले.

यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,जि.प.गटनेते शशिकांत साळुंखे,प्रमोद पाटील,कैलास सुर्यवंशी,उद्धव महाजन,जि.प.सदस्य भूषण पाटील,पं.स.सदस्य अजय पाटील,प्रदीप निकम,नगरसेवक भगवान पाटील,दिपक पाटील,जगदीश चौधरी,भैयासाहेब पाटील,अमोल चौधरी,दिपक सुर्यवंशी,शुभम पवार,प्रकाश पाटील,प्रताप भोसले,कुशल देशमुख,आकाश पोळ,निखिल देशमुख,सौरभ त्रिभुवन,पंजाबराव देशमुख,कौस्तुभ राजपूत,चैतन्य देशमुख,सुदर्शन शिंदे,कुणाल पाटील,हृदय देशमुख,सोनू आहिरे,सुधीर पाटील,अक्षय बोरसे,गुंजन देशमुख,पिनू सोनवणे,यद्नेश बाविस्कर,अजय पाटील,राकेश पाटील,आकाश पाटील,शुभम महाजन,हृदय देशमुख,अभिषेक देशमुख आदींनी परिश्रम घेतलेत.

No comments:

Post a Comment