Search This Blog

Friday, August 9, 2019

मुढी गावात एक हजार लोकांचे स्थलांतरण .......

प्रतिनिधी, जळगाव ग्रामीण

पांझरा नदीपात्रातून सध्या 49 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मुढी गावात पाणी शिरले आहे. गावातील एक हजार नागरिकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर केले आहे. या नागरिकांना अमळनेर येथील मंगळग्रह देवस्थानच्या मदतीने खिचडीचे वाटप करण्यात आले आहे. याठिकाणी एक होडी उपलब्ध करून देण्यातआली आहे.

अक्कलपाडा धरण क्षेत्रात
रात्री पावसाचा वेग वाढल्यास पांझरा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यास अमळनेर तालुक्यातील नदी काठावरील मांडळ व 7 गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

भविष्यात काही परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी अमळनेरच्या प्रांताधिकारी श्रीमती स्मिता आहिरे , तहसीलदार ज्योती देवरे आदि या गावात लक्ष ठेवून आहेत.

जळगाव व धुळे जिल्ह्यात सध्या तरी कुठलीही आपत्तीची परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये.  तथापि वाहत्या पाण्यातून जावू नये. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच प्यावे. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती  उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी धुळे येथे एनडीआरएफ चे एक पथक दाखल झाले आहे.


No comments:

Post a Comment