संपूर्ण देश 73 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना महाराष्ट्र शासन मात्र आपल्या अधिकृत ब्लॉग महासंवाद वर 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहे, अशा वेळीस प्रश्न निर्माण होतो की , महाराष्ट्र भारता पासून वेगळा होऊ पहात आहे काय ? की आपण आपल्या अधिकृत ब्लॉग वर नेमकी कुठली माहिती पोस्ट करतो आहे आणि ती माहिती किती प्रमाणित आहे याची साधी दखल महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभागाने घेऊ नये ? की शासनच आता तळीराम अवस्थेत गेले आहे.असे एक ना अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिला आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर शासन स्तरावरुन जनतेला नेमके कोण देणार ? असाही सुर विरोधी पक्षातून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे
मालदीव चे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या सह अनेक राष्ट्रांच्या राष्ट्र अध्यक्षांनी आणि प्रधानमंत्र्यानी आपल्या देशाला 73 व्या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. पण आपण 72 वा स्वतंत्र दिवस साजरा करतोय हे फार विरोधाभास निर्माण करणार आहे आणी विशेष बाब हे निर्माण झालेल कोड आपल्या राज्याच्या गाफिल कारभाराला अधोरेखित करणार आहे.
आमच्या प्रतिनिधींनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस चे विद्दमान आमदार डॉ सतीश पाटिल यांच्याशी संपर्क करून संबंधित विषयावर प्रश्न केला. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली "आज देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिवस आहे पण राज्याचे मुख्यमंत्री 72 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करता आहेत हे मुख्यमंत्र्यांचे अज्ञान आहे की देशासंबंधी प्रेम ? हे ह्या वरुन दिसून येत आहे.आता हे जे सार चालय हे सार अंदाज पंचे दहाशे सुरु आहे. हे देश प्रेम दाखवतात ? पण आपल्या देशाचा कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतोय हेच त्यांना माहित नाही ह्यावरुन त्यांच देश प्रेम लक्षात येईल .
जलसंपदा आणि वैदकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी प्रतिनिधिंनी संपर्क साधला असता मंत्री महाजन यांचा फोन कव्हरेज मध्ये नसल्यामुळे महाजन यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.
त्या नंतर आमच्या प्रतिनिधिने भाजपा नेते डॉ गुरुमुख जगवानी(राज्यमंत्री दर्जा ) ह्यांच्याशी संपर्क साधला असताना घटने संबंधी प्रतिक्रिया मागितली असता त्यानी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
आता ७२/७३ च कोडं राज्याचे मुख्यमंत्री कसे सोडवतात याकडे विरोधी पक्षासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
No comments:
Post a Comment