Search This Blog

Wednesday, August 7, 2019

पर्यावरणपूरक प्रकल्‍प उभारणीची सुरुवात स्वत:पासून करा - न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई, दि.  : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना,कचऱ्यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्यूयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सांगितले.

मंत्रालयात आज न्यूयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने श्री. तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नेल फिलीप्सडॉ. ड्रेक स्कीटप्राध्यापिका पोरोमिता सेनऑस्ट्रेलियाच्या शासनाचे प्रतिनिधी ग्रेक ग्रुस यासह विज्ञान,पर्यावरणमानवी सेवाअभियंता अशा विविध विषयांचे विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणालेभारतात विविध संस्कृतीचे जतन केले जाते आणि विविध भाषा बोलणारे लोक आहेत. पूर्वापार निसर्गाचे जतन करण्याची पद्धती येथे आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे त्यात बदल होत आहेत. राज्यातील शिक्षणपद्धती,राजकारण आणि बॉलिवूडसंदर्भात श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतातील पर्यावरण पूरक आणि कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्प निर्मितीची अंमलबजावणी करा असेही श्री. तावडे यांनी यावेळी चेर्चेदरम्यान सांगितले.

परदेशी अभ्यास कार्यक्रमांतर्गत हे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियास्पेन नंतर भारत दौऱ्यावर आहे. पर्यावरणाचा अभ्यास व संरक्षणकचऱ्यापासून खतांची निर्मितीसौरऊर्जासेंद्रीय खते,योगा आदींवर चालणारे जीवनमान या विषयांवर ते पालघर येथील गोवर्धन इको गावात राहून अभ्यास करीत आहेत. या शिष्टमंडळाने भारतातील गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ हजार रूपये इतकी आर्थिक मदत केली आहे. याचबरोबर गोवर्धन गावात सीयूएनवाय मार्फत वेदर स्टेशन बॉक्स प्रदान करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment