Search This Blog

Friday, August 9, 2019

महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करावाअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

"राईट टू पी" अंतर्गत महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विधानभवनमुंबई येथील उप-सभापती यांच्या दालनात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 म्हाडाने २०१६ नंतर बांधलेल्या शौचालयांचे देखभाल व दुरुस्तीसाठी तत्काळ उपाययोजना करावी तसेच २०१६ पूर्वी बांधलेल्या शौचालयांचे सर्वेक्षण करून त्यासाठी आवश्यक निधीची शासनाकडे अथवा जिल्हा नियोजनकडे मागणी करावी व इतर शौचालये लवकरात लवकर दुरुस्त करून महिलांचे वापरात येण्याच्या दृष्टीने तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी दिले.
 संपूर्ण राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पेट्रोलपंपवरील स्व्च्छतागृहे महिला व पुरुषांकरीता उपलब्ध असल्याची माहिती गुगलवर टाकण्यात यावीअसे निर्देश बैठकीत देऊन मुंबईतील  द्रुतगती मार्गावर प्रयोगिक तत्वावर बाँयो टॉयलेट पंधरा दिवसांत उपलब्ध करुन देण्यात यावे व याबाबतची माहिती गुगलवर देण्यात यावीअसेही निर्देश यावेळी देण्यात आले.
 स्वच्छतागृहात जाणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावणेबाजारपेठ व उद्यानात स्वच्छतागृहे निर्माण करणे,  बायो टॉयलेटची उभारणी करणेबाबत म्हाडाने किंवा मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही करुन याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करावाअसेही निर्देश बैठकीत देण्यात आले. 
 म्हाडाने स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करुन नादुरुस्त असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच जाळी लावणेतुटलेल्या काचा काढून नविन काचा बसविणेमोठे लाईट्सफरशी यासारख्या दुरुस्त्या करुन घ्याव्यात,असे निर्देश यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलम्हाडाचे मुख्याधिकारी शहाजी पवारमुंबई महानगरपालिका शिवसेना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासरावमाजी महापौर स्नेहल आंबेकर,नगरसेविका शीतल म्हात्रे,  उप-मुख्य अभियंता मु.झो.सु.मं. म्हाडा,अन्न व नागरी पुरवठा सहसचिव मनोजकुमार सूर्यवंशीश्री. सुधीर पाटीलम्हाडाचे उप-अभियंता श्री. प्रशांत धात्रकअजित पालवे नगरविकास कक्ष अधिकारीजयंत दांडेगावकर राज्य अभियान संचालक-स्वच्छता महाराष्ट्र अभियान  नागरीराईट टू पी च्या कार्यकर्त्या सुप्रिया सोनारमुमताज शेखरोहिणी कदमउषा देशमुख,पेट्रोलियम पंपाचे प्रतिनिधीमुंबई महानगरपालिका अधिकारीम्हाडाचे अधिकारी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment